MS धोनीला त्याच्या शेवटच्या सीरिजबद्दल सलेक्टर्संनी सागांवं, ‘या’ माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप संपल्यानंतर लगेच महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात जोर धरत होत्या. भारतीय संघाचा कर्णधार कोहलीच्या सल्ल्यानंतरच धोनीने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. कर्णधार कोहलीला धोनीच्या फिटनेसवरून काहीही चिंता नसून तो पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत खेळणार आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने धोनीच्या निवृत्तीवर मोठे भाष्य केले आहे.

धोनी जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय लष्कराची सेवा बजावून नुकताच घरी परतला आहे. तो सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून याबाबत त्याने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. गेले अनेक दिवस धोनी भारतीय लष्कराची सेवा बजावत होता. त्यानंतर आता वीरेंद्र सेहवाग याने धोनीच्या निवृत्तीवर भाष्य करताना म्हटले आहे कि, जर निवड समितीला धोनी संघात नको असेल तर त्यांनी त्याला कोणत्या शेवटच्या मालिकेत खेळणार आहे हे सांगायला हवे. याबाबत पुढे बोलताना सेहवाग म्हणाला कि, निवृत्ती कधी घ्यायची हा धोनीचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर त्याला वाटत असेल कि तो पूर्ण फिट आहे आणि भारतीय संघासाठी योगदान देऊ शकतो तर त्याने पुढे खेळात राहायला हवे. जर त्याला संधी मिळणार नसेल तर निवड समितीने त्याच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.

हे शक्य नाही
आणखी एका प्रश्नावर बोलताना सेहवाग म्हणाला कि, मला माहित नाही कि, खेळाडू आणि निवड समिती या प्रकरणावर एकमेकांशी बोलत आहेत कि नाही. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी धोनीला तू पहिली पसंद नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अर्थातच ते रिषभ पंत यालाच निवडणार आहे. गरज पडली तरच धोनीचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे धोनीला वाटेल त्या योग्य वेळी तो आपला निर्णय जाहीर करेल.

आरोग्यविषयक वृत्त –