5 कोटी रूपयांना विकली गेली शेन वॉर्नची ‘कॅप’, पण कोणत्या माणसानं नाही केली ‘खरेदी’, जाणून घ्या कोणाच्या हाताला लागली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या स्थितीला ऑस्ट्रेलिया मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. जंगलात लागलेल्या आगीने २० लोकांचा मृत्यू झाला असून करोडो प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे संकट आहे असे म्हटले जात आहे. तेथील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वच आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. मग तो एखादा खेळाडू असो, नेता अथवा सर्वसामान्य माणूस असो, सर्वच लोक एकत्र येऊन पीडितग्रस्तांना मदत पुरवीत आहेत. आस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) यानेदेखील या आपत्तीत आपले योगदान दिले आहे. दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याने पीडितांच्या मदतीसाठी बॅगी ग्रीन कॅपची निलामी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची ही टोपी तब्बल ५ कोटी रुपयांना विकली गेली आहे.

पूर्ण पैसे पीडितांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार
बॅगी ग्रीन कॅप (Baggy Green Cap) चे मानकरी होणे हे आस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी अतिशय सन्मानाची बाब असते. आणि या टोपीची निलामी करून पीडितग्रस्तांना मदत करणे हे त्याहूनही जास्त अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे ही टोपी कुणी माणसाने नाही तर चक्क एका बँकेने खरेदी केली आहे. शेन वॉर्नच्या या टोपीस कॉमनवेल्‍थ बैंक (Commonwealth Bank) ने जवळजवळ ४ कोटी ९३ लाख रुपयांमध्ये विकत घेतले आहे. यातील सर्व पैशांचा वापर हा पीडितग्रस्तांच्या मदतीसाठी करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय दौर्‍यावर जाणार आता शेन वॉर्नची बॅगी ग्रीन कॅप
कॉमनवेल्‍थ बैंक (Commonwealth Bank) चे सीईओ मॅट कॉमीन यांनी सांगितले की, शेन वॉर्नच्या या बॅगी ग्रीन कॅपला पीडितग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय दौर्‍यावर नेण्यात येणार आहे कारण यातून जास्तीत जास्त फंड जमा करता येईल. त्यानंतर या टोपीस ब्रँडमन म्युजिअम मध्ये ठेवण्यात येईल. मॅट कॉमीन यांनी सांगितले की, ‘मी शेन वॉर्नचे आभार मानतो की त्याने या अनमोल खजान्यास निलामीसाठी ठेवले. त्याने मदतीसाठी पुढे येऊन तीच उत्कटता कायम ठेवली जी आस्ट्रेलियन लोक आगीने पीडितग्रस्तांना करत आहेत.’

वॉर्नने डॉन ब्रॅडमनला मागे टाकले
शेन वॉर्नच्या टोपीची किंमत दोन तासांत सहा लाख डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. यापूर्वी माजी महान खेळाडू डॉन ब्रॅडमन (Don Bradman) ची बॅगी ग्रीन कॅप जानेवारी २००३ मध्ये ४ लाख २५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे ३ कोटी ६ लाख रुपये) मध्ये विकली गेली होती. त्यावेळी ही विक्रमी किंमत होती. परंतु आता वॉर्नने ब्रॅडमनला मागे टाकले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून ७०८ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमधील विकेटच्या बाबतीत श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन नंतर वॉर्न दुसर्‍या स्थानावर कायम आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/