कारर्किदीत पहिल्यांदाच रविंद्र जडेजाची होतेय ‘धुलाई’, ‘या’ फलंदाजानं ठोकले ‘झटापट’ 9 सिक्सर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) ने १३९ धावांची तुफानी खेळी खेळली. हेटमायरच्या या शतकी खेळीने टीम इंडियावर मात केली आणि वेस्ट इंडीजने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला. शतकात भारताच्या सर्व गोलंदाजांविरूद्ध हेटमायरने शानदार फलंदाजी केली. लेफ्टी असलेल्या हेटमायरला कमकुवत चेंडू मिळाला की त्यावर चौकार मारत हेटमायरने सर्व गोलंदाजांना परेशान करून सोडले. हेटमायरने त्याच्या डावात ७ लांब षटकार ठोकले. त्यापैकी जडेजाच्या चेंडूवर सर्वात जास्त ३ षटकार लगावले. सध्याच्या संघात जडेजा हा भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. परंतु हेटमायरने त्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला.

हेटमायरने केला जडेजावर जोरदार मारा
वेस्ट इंडीजचा फलंदाज हेटमायरने भारत दौर्‍यावर आतापर्यंत ४ सामन्यांमध्ये १७ षटकार ठोकले आहेत, त्यापैकी ९ रवींद्र जडेजाला ठोकले आहेत. या दौर्‍यावर हेटमायरने जडेजाविरुद्ध ५० चेंडूत ८५ धावा फटकारल्या आहेत. जडेजा एकदिवसीय आणि टी २० फॉर्मेटचा हुशार आणि अनुभवी गोलंदाज मानला जातो, म्हणूनच धोनीने त्याचे नावही ‘सर जी’ ठेवले. परंतु हेटमायरसमोर जडेजाचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत.

हेटमायरसमोर जडेजा का ठरतोय फोल
हेटमायरसमोर जडेजा फोल ठरतोय याचे कारण म्हणजे त्याची लेंथ. खरतर जडेजाला फारसा टर्न मिळत नाही आणि तो नेहमी आपल्या टर्न आणि वेगवान चेंडूने फलंदाजाला परेशान करत असतो. तथापि, त्याची गोलंदाजी हेटमायरच्या पुढे फिकी पडत आहे कारण हा फलंदाज शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू मारण्यात पटाईत आहे. तो शॉर्ट बॉलवर ४० टक्क्यांहून अधिक धावा करतो आणि जडेजाने लेंथ चुकवताच, हेटमायर त्या चेंडूस चौकार मारतो. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की हेटमायर शॉर्ट चेंडूला एकदाही गमावत नाही, यामुळेच तो धोकादायक फलंदाज बनतो.

हेटमायरचे भारत दौर्‍यावरवरील कामगिरी
चेन्नई एकदिवसीय सामन्यात १३९ धावांची खेळी करणाऱ्या हेटमायरने टी -२० मालिकेतही शानदार फलंदाजी केली. त्याने ३ सामन्यांमध्ये ४० च्या सरासरीने १२० धावा केल्या आणि त्याचा स्ट्राइक रेट १५० च्या वर गेला. वेस्ट इंडीजकडून हेटमायर (Shimron Hetmyer) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता आणि त्याने आपल्या फलंदाजीमध्ये १२ षटकार ठोकले. हेटमायरने एकदिवसीय मालिकेतही टी -२० चा फॉर्म कायम ठेवला असून पुढील दोन सामन्यात तो टीम इंडियासाठी मोठा धोका ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/