वीरेंद्र सेहवागकडून ‘रावळपिंडी एक्सप्रेस’चा धुव्वा, म्हणाला – ‘पैशांसाठी शोएब अख्तर करतो टीम इंडियाची प्रशंसा’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तान संघांचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांचा मैदानावरील दबदबा सर्व क्रिकेट प्रेमींनी पाहिला आहे. एवढेच नाही तर दोन्ही खेळाडू आपल्या स्पष्टवक्तेपणाबद्दल चर्चेत असतात. एकीकडे सेहवानने ट्विटवरुन सर्वांचे मन जिंकले आहे तर शोएब यूट्यूबमुळे चाहत्यांच्या मनात आहे. मैदानात एकमेंकांच्या समोर येणारे खेळाडू आता मैदानाबाहेर एकमेकांचा सामना करत आहेत.

आता वीरेंद्र सेहवानने शोएब अख्तर निशाणा साधला आहे. ज्यात वीरेंद्र सेहवान म्हणाला की शोएब अख्तर पैशांसाठी भारतीय संघाचे कौतूक करतो. सेहवाग यांच्यानुसार शोएब अख्तर आमचा चांगले मित्र झाला आहे, कारण त्याला भारताकडून बिजनेस पाहिजे आहे. यासाठी तो भारतीय संघाचे कौतुक करतो. जर तुम्ही शोएब अख्तरची मुलाखत पहाल तर तुम्हाला दिसेल की तो भारताचे कौतुक करतो, जेव्हा तो खेळत होता तेव्हा तो असे म्हणत होता. शोएब आपल्या यूट्यूब चॅनलवरुन पाकिस्तानी क्रिकेट संघाची तुलना भारतीय संघाशी अनेकदा करताना दिसतो.

वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर देखील भडकला होता. त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की आता संघातील खेळाडूंचे धैर्य कमी झाले आहे का. यावर बोलताना सेहवाग म्हणाला की जेव्हा एमएस धोनी कर्णधार होता तेव्हा फलंदाजीच्या क्रमात खेळाडूंच्या स्थानाबाबत खूप स्पष्टता होती. तो प्रतिभा ओळखणारा होता आणि त्याने त्या खेळाडूंना ओळखले ज्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेले. त्याला महित होते की हे त्याचे सलामवीर आहेत, हे त्यांच्या मधल्या फळीतील आहेत, तो स्वत: 5 नंबरवर येत असे, त्यानंतर केदार जाधव 6 व्या नंबरवर आणि त्यानंतर हार्दिक पांड्या किंवा जडेजा. तो नंतर आलेल्या खेळाडूंना बॅकिंग देत असे.

आता केएल राहूल 5 व्या नंबरवर 4 वेळा चालला नाही तर त्यांची जागा विराट कोहली घेतो. धोनीच्या वेळी तो त्याची जागा बदलत नव्हता. तो त्याच क्रमांकावर खेळत होता.

फेसबुक पेज लाईक करा –