BCCI अध्यक्ष गांगुलीची IPL मध्येही ‘दादा’गिरी, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंपायरचा एक चुकीचा निर्णय आणि सामन्याचा निकाल बदलला असेच काहींसे चित्र गेल्या आयपीएलमध्ये पहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीने अंपायरची चूक सुधरवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जेणेकरून अंपायरकडून झालेली चूक नजरअंदाज होऊ होणार नाही.

अनेकदा सामना सुरु असताना अंपायरच्या नजर चुकीने नो बॉल दिला जात नाही त्यामुळे कोणत्या ना कोणत्या संघाला त्याचा मोठा फटका बसतो. म्हणून हे टाळण्यासाठी आता आयपीएलमध्ये नो बॉल तपासणीसाठी स्पेशल अंपायरची नियुक्ती केली जाणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

मुंबईत झालेल्या आयपीएलच्या गव्हर्नर काऊन्सलिंगच्या बैठकीत सौरव गांगुली यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीतील एका सिनिअर सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, सगळं ठीक झालं तर येत्या आयपीएलमध्ये चार अंपायर ऐवजी पाच अंपायर दिसतील. एक अंपायर फक्त आणि फक्त नो बॉलवर लक्ष देण्याचे काम करेल असे सांगण्यात येत आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यात झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात अशा प्रकारे नो बॉल पाहण्यासाठी अंपायर ठेवण्यात आला होता. त्यामुळे याबाबतची यशस्वी चाचणी झाली आहे. म्हणून आता याचा वापर आयपीएलमध्ये देखील केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या हंगामात मुंबई आणि बंगळूर दरम्यान अंपायरकडून अशीच मोठी चूक झाली होती. मुंबई आणि चेन्नई यांच्यादरम्यान देखील हेच घडले होते. मात्र आता या निर्णयामुळे नोबॉलच्या चुकीच्या निर्णयाला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Visit : policenama.com