BCCI अध्यक्ष पदावर राहण्यासाठी गांगुलीला द्यावी लागणार ‘कुर्बानी’, होणार मोठं नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 23 ऑक्टोबर रोजी गांगुलीच्या निवडीची अधिकृत घोष करण्यात येणार आहे. त्यानंतर 24 तारखेला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. मात्र 2015 पासून बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असलेल्या गांगुलीला या निवडीनंतर काही गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे.

गांगुली जवळपास ११ वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत असून यावेळी तो अध्यक्षपदाच्या रूपात मैदानात उतरणार आहे. मात्र यावेळी काही हितसंबंध ऍड येणार असून गांगुलीला यामुळे काही पदांवर तसेच गोष्टींवर पाणी सोडावे लागणार आहे. हा मुद्दा अनेक खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरला असून गांगुलीला देखील यामुळे त्रास होणार आहे.
cricket, cricket news, sourav ganguly, bcci, bcci cricket, indian cricket team, क्रिकेट, क्रिकेट न्यूज, बीसीसीआई, बीसीसीआई क्रिकेट, सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट टीम, कैब,
या भुमीका सोडाव्या लागणार
बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्यानंतर गांगुलीला अनेक गोष्टींवर पाणी सोडावी लागणार आहे. सध्या गांगुली बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असून त्याचबरोबर आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्स या संघाचा मेंटॉर देखील आहे. तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये तो स्तंभलेखन देखील करतो. समालोचन देखील तो अनेक वेळा करत असतो. त्याचबरोबर तो अनेक कार्यक्रमांमध्ये संचालन देखील करत असून अनेक जाहिरातींमध्ये देखील काम करत असतो. त्यामुळे आता गांगुलीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.

सचिन, लक्ष्मण आणि द्रविड देखील अडकले आहेत संकटात
लोढा समितीच्या शिफारशीनुसार कोणताही व्यक्ती एका पदापेक्षा आधिक ठिकाणी कार्यरत राहू शकत नाही. त्यामुळे याआधी सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांना देखील फटका बसला आहे. हितसंबंधामुळे द्रविडला आयपीएलमधील संघाचे प्रशिक्षकपद देखील सोडावे लागले होते. त्यावेळी द्रविड एकाचवेळी भारताच्या अंडर -19, भारतीय अ संघाचा आणि दिली डेअरडेव्हिल्स संघाचा प्रशिक्षक होता, त्यावेळी त्याला यातील एकच पद निवडण्याची मुभा देण्यात आली होती. सचिन आणि लक्ष्मणाला देखील याचमुळे आपली पदे सोडावी लागली होती.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या