SA च्या डुप्लेसीनं घेतला कसोटी आणि T-20 संदर्भात एकदम धक्कादायक निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज फाफ डुप्लेसीने मोठा निर्णय घेता आहे. त्याने कसोटी आणि टी-20 सामन्यांचे कर्णधारपद सोडले आहे. त्याने ?याआधीच वन डे संघाचे कर्णधारपद सोडले होते. इंग्लंड विरुद्ध वन डे सीरीजमध्ये डुप्लेसी ऐवजी क्विंटन डीकॉकला कर्णधार बनवण्यात आले होते. तसेच त्याला वन डे मालिकेत खेळवण्यात आले नव्हते.

डुल्पेसीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा संघ खराब प्रदर्शन करत होता ज्यानंतर त्याच्यावर कर्णधारपद सोडण्याचा दबाव टाकण्यात आला होता. त्याच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित होत होते. डुप्लेसीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने 8 पैकी 7 कसोटीत पराभव स्विकारला होता.

कर्णधार पद सोडल्यानंतर डुप्लेसी म्हणाला की हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण होता. मी जेव्हा संघाचे कर्णधारपद स्वीकारले होते तेव्हा माझे लक्ष संघाचे प्रदर्शन अधिक उत्तम करणे हे होते. आता संघ नव्या दिशेने जात आहे आणि मला वाटते की प्रत्येक प्रकारातील कर्णधार सोडण्याची ही योग्य वेळ आहे. हा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होते परंतु मी क्विंटन डीकॉक, कोच मार्क बाउचरला पूर्ण सहकार्य करेल. आम्ही संघासाठी मजबूत बनू.

फाफ डुप्लेसीच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने 112 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यातील 69 सामन्यात विजय मिळवला. डुप्लेसीच्या नेतृत्वात 36 कसोटी सामने खेळण्यात आले त्यातील 18 सामन्यात विजय मिळाला तर 15 सामन्यात पराभव झाला. 3 कसोटी सामने रद्द झाले. तर 39 पैकी 28 वन डे मध्ये विजय मिळवता आला आणि 10 सामने गमवावे लागले. तर एक सामना ड्रॉ झाला. तर डुप्लेसीच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने 37 टी-20 सामने खेळले त्याती 23 सामन्यात विजय मिळवला तर 13 सामन्यात पराभव झाला.

डुप्लेसीने कर्णधार पदी असताना चांगली फलंदाजी केली –
फाफ डुप्लेसीने दक्षिण आफ्रिकेसाठी 112 आंतरराष्ट्रीय सामन्यात 5101 धावा केल्या. ही सरासरी 43.59 राहिली. डुप्लेसीने कर्णधार पदी असताना 11 शतक आणि 28 अर्धशतक खेळी केली.

या कारणाने सोडावे लागले कर्णधार पद –
डुप्लेसीच्या कर्णधार पद सोडण्यामागे त्याचे कसोटीतील प्रदर्शन ठरले. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला 1-3 अशी मालिका गमवावी लागली. भारतात तर कसोटी सामन्यात 0-3 असा व्हाइटवॉश मिळाला. आयसीसी वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरी सामन्यात देखील पोहचू शकली नाही. त्यांनी 9 पैकी 5 सामने गमावले होते आणि त्यांना टुर्नामेंटमधून बाहेर पडावे लागले.