भारतीय संघाचा सामना करण्यासाठी विंडीजनं बोलावले ‘हे’ दोन हुकुमी एक्के

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघ पुढील महिन्यात वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार असून भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून आज विंडीजच्या संघाची देखील घोषणा करण्यात आली. या संघात स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याचा समावेश नसला तरी विंडीजचा संघ घातक दिसत आहे. कीरेन पोलार्ड याने मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन केले असून आंद्रे रसेल हा देखील फिट झाला आहे. त्यामुळे विंडीजचा संघ मजबूत वाटत आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या सुरुवातीच्या २ टी-२० सामन्यांसाठी पोलार्ड आणि सुनिल नारायण यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर एंथनी ब्रेंबल हा युवा फलंदाज आपले पदार्पण करणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप बाहेर राहाव्या लागलेल्या आंद्रे रसेलचे देखील संघात पुनरागमन झाले आहे. तर ख्रिस गेल या मालिकेसाठी उपलब्ध नसून तो कॅनडा ग्लोबल टी-२० सामन्यांत खेळत आहे. त्याच्याजागी जॉन कैंपबेल याचा समावेश करण्यात आला आहे.

२ वर्षानंतर खेळणार टी-२०

बोटाला झालेल्या दुखापतीमुळे वर्ल्डकपला मुकलेल्या सुनील नारायण याचे देखील संघात पुनरागमन झाले आहे. दोन वर्षानंतर तो टी-२० सामना खेळणार असून फिरकी गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. त्याचबरोबर किरॉन पोलार्ड याची देखील टी-२० संघात निवड करण्यात आली आहे. निवड समितीच्या सदस्यांनी यावर बोलताना म्हटलं कि, आम्ही फक्त भारताच्या मालिकेचा विचार न करता पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपचा देखील विचार करून संघ तयार करत आहोत.

पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी विंडीजचा संघ

कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार ), शेल्डन कॉटरेल, शिमरोन हेटमायर, किरॉन पोलॉर्ड, निकोलस पूरन, रोवमैन पॉवेल, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस, एंथनी ब्रेंबल, जॉन कैंपबल, एविन लुइस, सुनील नरेन, कीमो पॉल, पियरे.

आरोग्यविषयक वृत्त –