ICC World Cup 2019 : ‘भूमिका’ नीट पार न पाडल्यामुळं टीम इंडियातून ‘यांची’ हकालपट्टी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे यातील काही जणांची सुट्टी होण्याची टांगती तलवार आहे.

सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्यावर मोठी टीका झाली होती. वर्ल्डकप नंतर रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा कालावधी संपणार होता. मात्र बीसीसीआयने त्यांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता बीसीसीआय प्रत्येकाच्या कामगिरीवर नजर ठेवून आहे.

संजय बांगर यांना यापेक्षा चांगली कामगिरी करता आली असती. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवर बीसीसीआय नाराज असल्याची माहिती मिळत आहे. संजय बांगर यांनी आपले काम चांगले केले नसल्याच्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर यांनी देखील खेळाडूंकडून चांगली फिल्डिंग करून घेतल्याचे मैदानात दिसून आले. मात्र फलंदाजीमध्ये भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा तिढा शेवटच्या सामन्यापर्यंत सोडवता न आल्याने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे प्रशिक्षक संजय बांगर यांना यासाठी जबाबदार ठरवण्यात येत आहे.

टीम मॅनेजरच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
संजय बांगर यांच्याबरोबरच संघाचे मॅनेजर सुनील सुब्रह्मण्‍यम यांच्या भूमिकेवर देखील बीसीसीआय नाराज आहे. संघाचे काम सोडून ते आपल्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तींना सामन्याची तिकिटे आणि पास मिळवून देण्यातच व्यस्त होते.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

You might also like