टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ ‘या’ तारखेला होणार जाहीर, ‘या’ प्रशिक्षकांना मिळणार डच्चू ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता सपोर्ट स्टाफची निवड लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय संघाने २२ ऑगस्ट हि तारीख नक्की केली असून या दिवशी सर्व सपोर्ट स्टाफची निवड केली जाणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीने याची देखील परवानगी मागितली होती, मात्र त्यांची हि परवानगी फेटाळण्यात आली असून आता बीसीसीआय स्वतः सपोर्ट स्टाफची निवड करणार आहे.

यासाठी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांना याची जबाबदारी देण्यात आली असून हे सपोर्ट स्टाफची निवड करणार आहेत. हि समिती २२ ऑगस्ट रोजी त्यांची नावे जाहीर करणार आहे. २२ ऑगस्ट रोजी हि निवडीची प्रक्रिया केली जाणार असून त्याच दिवशी नावांची घोषणा देखील करणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. या निवड प्रक्रियेत भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असून गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना पदावर कायम ठेवले जाऊ शकते. त्याचबरोबर फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांची देखल जागा धोक्यात असून यासाठी अनेक अर्ज आल्याने त्यांच्यासमोर नवीन उमेदवारांचे आव्हान असणार आहे.

दरम्यान, वर्ल्डकपमध्ये भारताच्या फलंदाजीच्या अपयशासाठी बांगर यांना जबाबदार धरण्यात आले असून त्यांची हकालपट्टी निश्चित आहे. विक्रम राठोड यांनी पंजाब आणि हिमाचल प्रदेश या संघाचे देखील त्यांनी याआधी प्रशिक्षकपद भूषविले आहे.

कोण आहेत विक्रम राठोड

बॅटिंग कोचच्या पदासाठी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट, अमोल मुझूमदार, ऋषिकेश काणेटकर, प्रवीण आम्रे, लालचंद राजपूत, तिलन समरावीरा मार्क रामप्रकाश आणि विक्रम राठोड यांनी अर्ज केले आहे. यामध्ये विक्रम राठोड यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी भारतासाठी ६ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळले असून त्यांना प्रथमश्रेणी सामन्यांचा खूप मोठा अनुभव आहे. ते २०१२ ते २०१६ या कालावधीत भारतीय निवड समितीचे सदस्य देखील होते.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like