…म्हणून टीम इंडियाच जिंकणार २०२३ चा वर्ल्डकप, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मत करत विजय मिळवला आणि इतिहास घडवला. सामना आणि सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर बाउंड्रीच्या जोरावर इंग्लंडने या सामन्यात विजय मिळवला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विजय मिळवणाऱ्या इंग्लडच्या संघाने या सामन्यात अतिशय उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडला पराभूत केले. २०१९ नंतर आत २०२३ मध्ये पुढील वर्ल्डकप भारतात होत असून या वर्ल्डकपचे आयोजन भारत एकटा करणार आहे. याआधी १९८७ मध्ये इंग्लंडच्या ऐवजी भारत आणि पाकिस्तानला संयुक्तपणे यजमानपद देण्यात आले होते. त्यानंतर १९९६ मध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेने हि स्पर्धा आयोजित केली होती. तर २०११ मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशने स्पर्धेचे यजमानपद मिळवले होते. मात्र आता भारत एकटा या स्पर्धेचे आयोजन करणार असून या स्पर्धेचे विजेतेपद कुणाला मिळणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

मागील तीन वर्ल्डकपवर नजर टाकली तर भारतीय संघ हा वर्ल्डकप जिंकणे हे जवळपास नक्की आहे. कारण २०११ मध्ये वर्ल्डकप जिंकणारा भारत पहिला यजमान देश बनला होता. त्यानंतर २०१५ मध्ये यजमान ऑस्ट्रलियाने या स्पर्धेत विजय मिळवला तर २०१९ मध्ये यजमान इंग्लंडने या स्पर्धेत विजय मिळवल्याने २०२३ मधील स्पर्धा भारतच जिंकणार हे नक्की आहे.

पुढीलप्रमाणे आहे इतिहास

२०११ : धोनीने मारला विजयी षटकार
icc, cricket, icc cricket world cup 2023, indian cricket team, india, आईसीसी, क्रिकेट, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023, भारतीय क्रिकेट टीम, भारत, वर्ल्ड कप चैंपियन, world cup champion
भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला होता. मात्र त्यानंतर २८ वर्षांनी भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप जिंकला. २०११ मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशने सयुंक्तपणे यजमानपद भूषवले होते. फायनलमध्ये भारतने श्रीलंकेचा पराभव करत विजेतेपद पटकावले. अत्यंत रोमांचक अशा या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने शानदार ९१ धावांची खेळी करताना षटकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

२०१५ : ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा विजेता
icc, cricket, icc cricket world cup 2023, indian cricket team, india, आईसीसी, क्रिकेट, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023, भारतीय क्रिकेट टीम, भारत, वर्ल्ड कप चैंपियन, world cup champion
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही यजमान संघांनीच अंतिम सामना खेळाला होता. या संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रलियाने दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले होते. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रलियाने न्यूझीलंडचा दारुण पराभव करत वर्ल्डकपच्या इतिहासात पाचव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

२०१९ : इंग्लंडने रचला इतिहास
icc, cricket, icc cricket world cup 2023, indian cricket team, india, आईसीसी, क्रिकेट, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023, भारतीय क्रिकेट टीम, भारत, वर्ल्ड कप चैंपियन, world cup champion
वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदा विजेतेपद मिळवणाऱ्या इंग्लडने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत शानदार विजय मिळवला. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार असणाऱ्या इंग्लंडने शानदार कामगिरी करत आपल्या देशवासियांना जल्लोष करण्याची संधी दिली. सामना आणि सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर बाउंड्रीच्या जोरावर इंग्लंडने या सामन्यात विजय मिळवला. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विजय मिळवणाऱ्या इंग्लडच्या संघाने या सामन्यात अतिशय उत्तम कामगिरी करत न्यूझीलंडला पराभूत केले.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

You might also like