ICC World Cup 2019 : टीम इंडियाच फायनलमध्ये पोहचणार, ‘हा’ घ्या भक्‍कम पुरावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता सेमीफायनल सामने होणार असून उद्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे. सर्व क्रीडा रसिकांचे या सामन्याकडे लक्ष लागले असून या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करण्याची भारताकडे मोठी संधी आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असून भारत वर्ल्डकप सामन्यांत न्यूझीलंडवर भारी नसला तरी सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडच्या खूप पुढे आहे.

२००७ पासून सलग चार वेळा त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१५ मध्ये मायदेशात खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत त्यांना अंतिम सामन्यात प्रवेश करता आला होता. मात्र त्यांना त्यात विजेतेपद पटकावता आले नव्हते. यावर्षी देखील ते विजेतेपदापासून दोन पावले दूर असून यावेळी ते विजय साजरा करतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २०१५ मध्ये अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

या स्पर्धेत न्यूझीलंडने ९ सामन्यांपैकी ५ सामन्यांत विजय मिळवला असून गुणतालिकेत ते ११ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकून सेमीफायनलमध्ये जागा मिळवलेल्या न्यूझीलंडसाठी यावेळी हि उत्तम संधी आहे. मात्र आकडेवारी भारताच्या बाजूने असल्याने या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. भारतीय संघाने सातव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून याआधीच्या सहा सेमीफायनलपैकी तीनमध्ये भारताने विजय मिळवला असून तीन सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आठव्यांदा या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. १९८३ आणि २०११ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला असून २००३ मध्ये भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना स्वीकारावा लागला होता. त्यामुळे साखळी सामन्यांत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाला फायनलमध्ये खेळण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही.

दरम्यान, २०१५ मध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या भारतीय संघाकडे यावेळी चांगली संधी असून उद्याच्या सामन्यात भारतीय संघाचं विजय मिळवणार असा विश्वास भारतीय चाहत्यांना आहे. त्याचबरोबर या आकडेवारीच्या जोरावर यावेळी भारतीय संघ विजय साजरा करतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक