‘या’ दिवशी निवृत्ती घेणार विराट कोहली, पीटरसनसोबतच्या ‘चॅटिंग’ दरम्यान केला स्वतः खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभराची नजर त्या दिग्गज क्रिकेटर कडे लागली आहे जो आयपीएलमधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. तो म्हणजे महेंद्र सिंह धोनी. तो आपल्या भविष्याबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. धोनीने जवळपास 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही आणि या दरम्यान त्याच्या क्रिकेटमधून संन्यासाची चर्चा होत आहे. परंतु आता भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटमधून कधी संन्यास घेणार यावर चर्चा रंगली आहे.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनसह इंस्टाग्रामवर झालेल्या चर्चेत भारताचा कर्णधार विराट कोहली यांनी याचा खुलासा केला की तो खेळाला कधी रामराम ठोकणार आहे.

धोनी म्हणाला, पाहू इच्छितो की विराट त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये असाच राहतो की नाही –
इंग्लंडचा खेळाडू केविन पीटरसनने लाईव्ह चॅट सेशनमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्रिकेट आणि त्याच्या खासगी जीवनासंबंधित अनेक प्रश्न विचारले, पीटरसनने देखील काही चांगले किस्से शेअर केले, ज्यात त्याने सांगितले की जी जिममध्ये होतो आणि ट्रेडमिलवर धावत होतो. तेथे धोनी देखील होता. यावेळी आम्ही तुमच्या कर्णधार पदाबद्दल चर्चा करत होतो. तेव्हा धोनी म्हणाले होते की मी हे नक्की पाहू इच्छितो की तुम्ही एवढीच ऊर्जा, उत्साह आणि आक्रमकता तुमच्या पूर्ण करिअर दरम्यान ठेवू शकतात की नाही.

ज्या दिवशी 120 टक्के देऊ शकणार नाही तेव्हा संन्यास घेईल –
केविनने हा किस्सा सांगितल्यानंतर विराटने उत्तर दिले की मी मैदानात सर्व काही झोकून देतो आणि एनर्जी लेवल बरीच उंचावलेली असते. ज्या दिवशी मैदानात आपले 120 टक्के योगदान देणार नाही, त्याच दिवशी या खेळातून संन्यास घेईल.

मी स्वत:ला वचन दिले की… –
विराट कोहलीच्या मते, तुम्ही महेंद्र सिंह धोनीला विचारु शकतात की जेव्हा मी त्यांच्या नेतृत्वात खेळत होतो तेव्हा प्रत्येक ओवरमध्ये मी त्याला काहीना काही बोलत असायचो, की आपण हे करु शकतो आपण ते करु शकतो. मी लांग ऑनमध्ये धावून लांग ऑफमध्ये जाऊ शकतो, मला क्रिकेटचा आनंद घेण्यात मजा येते. मी प्रत्येक चेंडूवर 120 टक्के देतो. मी आणखी वेगळं खेळू शकत नाहीत. मी स्वत:ला हे वचन दिले आही की ज्या दिवशी मला वाटेल की मी अशा प्रकारे खेळू शकत नाही, त्या दिवशी मी खेळाला राम राम ठोकेल. माझे अनेक सहकारी म्हणतात की तू विकेट गेल्यावर सर्वात जास्त आनंद साजरा करतो, परंतु मी त्यावर आणखी काही करु शकत नाही.