13 कसोटी सामने खेळलेल्या भारताच्या ‘या’ माजी गोलंदाजांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेल याच्यावर बडोदा क्रिकेट संघाच्या हितरक्षक समितीचे अध्यक्ष देवेंद्र सुरती यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुनाफ पटेल याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीत केला आहे. मात्र मुनाफ पटेल याने या आरोपांना निराधार म्हटले आहे. काल गुरुवारी सकाळी त्याने हि धमकी दिल्याचे सुरती यांनी म्हटले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नवापुरा पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक आर. एम. चौहान यांनी सांगितले कि, सुरती यांनी आम्हाला एक निवेदन दिली असून त्यांनी याविषयी तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे आम्ही या प्रकरणात कोणतेही एफआयआर दाखल केलेले नाही. याविषयी सुरती यांनी सांगितले कि, बडोदा क्रिकेट संघटनेत सुरु असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात मी आवाज उठवल्याने मला निशाणा बनविण्यात येत आहे.

मुनाफ पटेल हा सध्या बडोदा क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ संघाचा मेंटॉर आहे. देवेंद्र सूरती यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मी निवेदनात म्हटले आहे कि, माझ्या कुटुंबाला भविष्यात कोणतीही हानी पोहोचल्यास याला सर्वस्वी जबाबदार हा मुनाफ पटेल असेल. मात्र मुनाफ पटेल याने हे आरोप फेटाळले आहेत. सुरती यांनी केलेल्या आरोपांशी माझे काहीही संबंध नसून मला विनाकारण या प्रकरणात ओढले जात असल्याचा आरोप त्याने केला आहे. मी फक्त संघाचा मेंटॉर असून माझी निवड प्रक्रियेत कोणतीही भूमिका नसल्याने हे आरोप निराधार आहेत.

दरम्यान, मुनाफ पटेल याने भारतीय संघासाठी 13 कसोटी सामने खेळले सून यामध्ये त्याने 35 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 70 एकदिवसीय सामन्यांत त्याने 86 विकेट देखील घेतल्या आहेत. मुनाफने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like