एकेकाळी पाणीपुरी विकली, 3 वर्ष तंबूत राहिला, आता 17 वर्षाच्या ‘या’ फलंदाजानं केली ‘धुव्वाधार’ बॅटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलामी फलंदाज यशस्वी जयसवाल याची शानदार शतकी खेळी आणि आदित्य तरे याच्या 86 धावांच्या जोरावर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याला 130 धावांनी नामवंत शानदार विजय मिळवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152धावांची भागीदारी केली.

मुंबईने निर्धारित 50 शतकांत चार विकेटच्या मोबदल्यात 362 धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. त्याचा पाठलाग करताना गोव्याला केवळ 232 धावाच करता आल्या. 17 वर्षीय यशस्वी जयस्वाल याचा हा लिस्ट ए मधील दुसराच सामना होता. त्याने त्याच्या शतकी खेळीत सहा चौकार आणि पाच षटकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यर याने 47, सूर्यकुमार यादव याने 34 तर शिवण दुबे याने देखील नाबाद 33 धावांची खेळी केली.

जयस्वाल- तरे यांची 152 धावांची भागीदार
नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी गोव्याच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152 धावांची भागीदारी केली. 29 षटकातच या दोघांनी हि धावसंख्या उभारली. त्यानंतर तरे बॅड झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सिद्धार्थ लाड याच्या साथीने जयस्वाल याने 72 धावा केल्या.

mumbai cricket team, vijay hazare trophy, yashasvi jaiswal, shreyas iyer, suryakumar yadav, यशस्वी जयसवाल, मुंबई क्रिकेट, विजय हजारे ट्रॉफी

दुबे-यादव यांनी शेवटच्या चार षटकांत झोडल्या 52 धावा
कर्णधार श्रेयस अय्यर याने देखील मैदानावर फलंदाजीला येताच फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने 20 चेंडूत 47 धावा केल्या. त्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी शेवटच्या चार षटकांमध्ये 52 धावा करत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.

कुटुंब आणि घर सोडून मुंबईला गेलेल्या यशस्वीची कहाणी फार प्रेरणादायी आहे. खूप लहान वयातच तो क्रिकेटसाठी उत्तरप्रदेशमधून मुंबईमध्ये आला होता. मुंबईत आल्यानंतर आपल्या काकाच्या राहण्यासाठी जागा कमी असल्यामुळे तो मुस्लिम यूनाइटेड क्लबमध्ये एका तंबूमध्ये राहत असे. त्याने तीन वर्ष तंबूमध्ये दिवस काढले.

पाणीपुरी विक्री , भुका राहिला आणि….
त्याचे वडील अनेकवेळा पैसे पाठवत असत मात्र ते कमी पडत असत. तो रामलीलाच्या वेळी आझाद मैदानावर त्याने कितीतरी वेळा पाणीपुरी विकली. मात्र तरीदेखील त्याला अनेक वेळा उपाशीपोटी राहावे लागत असे. त्यानंतर त्याची भेट एका स्थानिक प्रशिक्षकाशी झाली. त्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून गेले. आणि आता त्याने नुकताच भारताच्या अंडर -19 संघामधून शानदार कामगिरी केली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like