काही झालं तरी खेळाडूंच्या ‘या’ महत्वाच्या गोष्टींचा निर्णय विराट आणि रवि शास्त्रीच घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघ जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर खेळण्यासाठी जातो. तेव्हा तेव्हा एकच प्रश्न उठवला जातो. तो म्हणजे भारतीय खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड असतील? यासंबंधी सर्व निर्णय बीसीसीआयची व्यवस्थापन समिती घेत होती आणि खेळाडूंना बीसीसीआयच्या व्यवस्थापन समितीच्या निर्णयाची वाट पाहावी लागायची. पण आता खेळाडूंना बीसीसीआयच्या व्यवस्थापन समितीच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. कारण यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आता भारतीय संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षकांना देण्यात आले आहेत. सीईओच्या ताज्या आदेशानुसार हे अधिकार कर्णधार आणि प्रशिक्षकांना देण्यात आले आहेत.

हा आहे सीईओंचा निर्णय

सीईओंनी सांगितले की, बीसीसीआयच्या नियमांना क्रिकेट व्यतिरिक्त असणाऱ्या मुद्यांपासून लांब ठेवले पाहिजे. बीसीसीआयच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१४ वर्षी इंग्लंड दौऱ्यात केलेल्या खराब कामगिरीमुळे खेळाडूंच्या पत्नींना आणि गर्लफ्रेंड्सना दौऱ्यावर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. विराट कोहलीने अनुष्का शर्माला या दौऱ्यावर नेल्यामुळे जोरदार टीका झाली होती. त्या वेळी विराट आणि अनुष्काचे प्रकरण नुकतेच बहरात आले होते. यांनतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाचे धोरण स्वीकारले आणि खेळाडूंसोबत पत्नी किंवा गर्लफ्रेंडना घेऊन जाण्यासाठी काहीच वेळासाठी दौऱ्यावर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली.

Loading...
You might also like