विराट कोहलीचा नवा ‘विक्रम’; ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

नवी दिल्ली :वृत्त संस्था भारतीय कर्णधार विराट कोहलीने वेस्‍ट इंडीज च्या विरोधात आज झालेल्या सामन्यात पुन्हा अर्धशतकी खेळी केली. आईसीसी क्रिकेट वर्ल्‍ड कप २०१९ मध्ये हे त्याचे सलग चौथे अर्धशतक आहे. त्याने आज ओशेन थॉमस च्या चेंडूवर एक रन घेऊन एकदिवसीय सामन्यांमधील आपले ५३ वे अर्धशतक पूर्ण केले. अशा प्रकारे वर्ल्ड कप मध्ये सलग चार सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.

त्याचबरोबर कोहली ने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ आणि ऑस्‍ट्रेलिया च्या एरोन फिंच च्या रिकॉर्ड ची देखील बरोबरी केली. आत्तापर्यंत केवळ या दोघांनी वर्ल्ड कप मध्ये सलग चार सामन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.स्मिथने २००७ मध्ये अशी कामगिरी केली होती तर फिंच आणि कोहलीने आत्ता चालू असणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये या कामगिरीची बरोबरी केली. त्याने आज ५५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०,००० धावा :

याआधी याच सामन्यात कोहलीने जेव्हा ३७ धाव केल्या तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या २०,००० धावा देखील पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान २०,००० धावा करणारा खेळाडू ठरला. इतक्या धाव त्याने केवळ ४१७ सामन्यांमध्ये केल्या. हा विक्रम त्याने वेस्‍ट इंडीज विरोधातील सामन्यात २५ व्या ओव्हरमध्ये जेसन होल्‍डरच्या चौथ्या चेंडूवर एक धाव काढून पूर्ण केला.

कोहलीने आत्तापर्यंत १३१ कसोटी, २२४ एकदिवसीय तर ६२ टी २० सामने खेळले आहेत. आत्तापर्यंत हा विक्रम भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्‍ट इंडीज च्या ब्रायन लारा यांच्या नावावर होता. सचिन आणि लारा यांनी ४५३ सामन्यांमध्ये २० हजार धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया चा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग हा होता. त्याने ४६४ सामन्यांमध्ये २०,००० धावांचा आकडा गाठला होता.

Advt.

दरम्यान आज झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने १२५ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. भारताने हा सलग पाचवा विजय मिळवला आहे त्याचबरोबर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा पुढील सामना ३० जून रोजी इंग्लड विरोधात होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे