वसीम अक्रमचा अंडरवियर वाला फोटो व्हायरल, पत्नीने ट्रोल करत विचारले – ‘क्या यह नॉर्मल है?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम त्याच्या जुन्या फोटोमुळे ट्रोल झाला आहे. स्पोर्ट्स प्रेजेंटर गौतम भीमानीने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर करत लिहिले की, “माझ्या आवडत्या क्रिकेटिंग होळीची आठवत.” भारत आणि पाकिस्तान संघाने पूलमध्ये होळी खेळली. भीमानीचा हा फोटो लोकांनाही आवडला आहे. पण या फोटोवर अक्रमची पत्नी शनायरा अक्रमने वेगवान गोलंदाजला ट्रोल केले आहे.

या फोटोत भीमणीसोबत वसीम अक्रम आहे. ज्यात अक्रम अंडरवेअर घातलेला दिसत आहे. त्याच्या चेहर्‍यावर रंग लागला आहे. वसीम अक्रमने हा फोटो रिट्विट करत लिहिले की, ‘होळीच्या शुभेच्छा, काय दिवस होता तो भारताचा 87 वा दौरा.’ 1987 मध्ये पाक संघ इम्रान खानच्या नेतृत्वात भारत दौर्‍यावर होता. येथे त्याने पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली. त्यावेळी वसीम अक्रम देखील पाकिस्तान संघाचा सदस्य होता आणि त्यावेळी तो फक्त 20 वर्षांचा होता.

फोटोवर भाष्य करताना शनायराने लिहिले, ‘आज जेव्हा मी ट्विटर उघडले तेव्हा मला माझ्या पतीचा अंडरवेअरमधला एक फोटो दिसला. हे नॉर्मल आहे का? ‘ यावर उत्तर देताना अक्रमने लिहिले की, ‘हे नवीन नॉर्मल आहे बायको आणि तुझ्या माहितीसाठी हे शॉट्स आहेत अंडरवियर नाही. याशिवाय अनेक चाहत्यांनीही अक्रमच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

पाकने 1-0 ने जिंकली कसोटी मालिका

1987 मध्ये या दौर्‍यावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने 1-0 असा विजय मिळवला. मालिकेच्या पहिल्या 4 कसोटी सामने अनिर्णीत होते. बंगळुरु येथे खेळल्या गेलेल्या अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानने भारताला 16 धावांनी पराभूत करून मालिका जिंकली. या सामन्यात अक्रमने दोन गडी बाद केले. अक्रमने मालिकेच्या 5 सामन्यात 13 गडी बाद केले होते. तो पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा खेळाडू होता.