विराट ठोकणार ‘इतकी’ शतके, भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूची ‘भविष्यवाणी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने भारताचा धडाकेबाज क्रिकेट पटू विराट कोहली आपल्या कारकिर्दीत केली शतक करु शकले याचे भाकित वर्तवले आहेत. वसीम जाफर यांनी ट्विट करत म्हणले की विराट त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत ७४ ते ८० शतके करु शकेल. विराटने विंडीज विरुद्धच्या सामन्यात नुकतेच ४२ वे शतक ठोकले. यानंतर जाफरने ट्विट करत हे भाकित वर्तवले.

विराटने विंडीज विरुद्धच्या सामन्यात केलेल्या शतकावर जाफरने म्हटले की, ११ डावांचा ब्रेक घेतल्यानंतर सामन्य सेवा पुन्हा एकदा सुरू झाली. विराटचे आणखी एक शतक, माझी ही भविष्यवाणी आहे की कोहली ७४ ते ८० शतके करेल.

विराटच्या खेळीनंतर म्हणले जात होती की विराट सचिनचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडेल. परंतू जाफरने ट्विट करत म्हणले की, फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच तो ७४ शतके करेल. कोहलीची आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६७ शतके झाली आहेत.

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आठव्या क्रमांकावर आहे. त्याने ११ हजार ३६३ धावा करणाऱ्या भारताच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले. कोहलीने २३८ सामन्यात ५९.७१ च्या सरासरीने ११ हजार ४०६ धावा केल्या आहेत. तर, सगळ्यात जास्त धावा करण्याता विक्रमही अजूनही सचिनच्या नावावर आहे. सचिनने ४६३ सामन्यात १८ हजार ४२६ धावा केल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like