पाकिस्तानी क्रिकेटरची धमकी – भारत ‘भित्रा’ देश, ‘आमच्याकडे परमाणु बॉम्ब… एका दमात साफ करू’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई पसरली असून त्यांनी आपल्या देशातील नागरिकांना संकटाच्या खाईत लोटले आहे. त्याचबरोबर अनेक धमक्या देखील पाकिस्तान भारताला देत असून आता तेथील क्रिकेटपटू देखील भारताला धमकी देत आहेत.

पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियांदाद यानं काश्मीर मुद्द्यावर आपले मत व्यक्त करताना भारताला धमकी दिली आहे. यावेळी त्याने धमकी देताना म्हटले कि, आम्ही सर्व हद्द पार करून भारतावर हल्ला करू. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्याने हे भाष्य केले आहे. त्याचबरोबर भारत हा भित्रा असून त्याला घाबरण्याची गरज नसल्याचे देखील त्याने म्हटले आहे. याआधी देखील शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, सरफराज अहमद यांनी या मुद्द्यांवर आपले मत मांडत आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली होती. वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तो पुढे म्हणाला कि, तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे मृतदेह घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणता सल्ला देणार या प्रश्नावर बोलताना तो म्हणाला कि, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत काय केले आहे. अणुअस्त्र आम्ही फक्त दाखवण्यासाठी ठेवले नसून संधी मिळाल्यास ती भारतावर डागणार सुद्धा आहोत.

दरम्यान, याआधी देखील अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविषयी बोलताना गरळ ओकली आहे. माजी खेळाडू शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर त्याचबरोबर पाकिस्तान संघाचा कर्णधार सरफराज अहमद याने देखील वादग्रस्त आणि भडकाऊ वक्तव्य केली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like