IPL : MS धोनीच्या जागी ‘हे’ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपरकिंग्सचे ‘कर्णधार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीगचे ऑक्शन आज कोलकत्यात सुरु आहे. त्यात प्रत्येक संघाला आपला उत्तम खेळाडू हवा आहे. त्यासाठी प्रत्येक संघ विविध खेळाडूंवर दावा करतील. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे तर तो मुंबई इंडियन, ज्यांनी चार वेळा आयपीएलमध्ये यश मिळवले. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे चेन्नई सुपरकिंग्स, ज्याचा कर्णधार धोनी होता ज्याने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

भारतीय संघातून माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने संन्यास घेतल्याच्या बातम्या जशा समोर आल्यात आता दुसरीकडे जवळपास हे निश्चित झाले की आयपीएल 2020 मध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपरकिंग्समधून धोनी खेळणार असे समोर आले. 2008 पासून आयपीएलच्या सुरुवातीपासून महेंद्र सिंह धोनी चेन्नई सुपरकिग्सचा कर्णधार आहे. परंतु 2020 मध्ये धोनीच्या भवितव्याबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यात एक मोठा प्रश्न होता की आता संघाचं नेतृत्व धोनी नसल्यास कोणता खेळाडू करणार. त्यानंतर काही खेळाडूंची नावे पुढे येत आहेत जे धोनीनंतर चेन्नई सुपरकिंग्सची कमान संभाळू शकतात.

1) हरभजन सिंह
हरभजन सिंह चेन्नई सुपरकिंग्सबरोबर मागील 2 वर्षापासून खेळत आहे. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या पहिल्या संघाने म्हणजेच मुंबई इंडियनने पहिला टी – 20 जिंकली होती. हरभजनच्या नेतृत्वात मुंबई इंडियनने 2011 मध्ये आरसीबीला हारवून टी – 20 आपल्या नावे केली होती. एवढच नाही तर चारदा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियनचा तो भाग राहिला आहे. जेव्हा मुंबई इंडियनने चौथ्यांदा विजय मिळवला होता तेव्हा तो चेन्नई सुपरकिंग्समध्ये होता. हरभजनने आयपीएलमध्ये 160 सामने खेळले आहेत. त्यात तो 150 सामन्यात सहभागी झाला. त्याचा इकोनॉमी रेट 7.05 आहे. मागील सीजनमध्ये त्याने 11 सामन्यात 16 विकेट घेतले होते.

2) सुरेश रैना
आयपीएलमधला सुरेश रैना हा स्टार खेळाडू मानला जातो. तो काही मिनिटात सामना फुरवू शकतो. त्यांने या टूर्नामेटमध्ये 193 सामने खेळले असून 5368 धावा जमावल्या आहेत. त्यांच्या नावावर 1 शतक आणि 38 अर्धशतक आहे. तो 28 वेळा नाबाद राहिला. त्याने टूर्नामेंटमध्ये 493 चौकार आणि 194 षटकार लागवले आहेत. रैनाने 101 झेल घेतले आहेत. तो यूपीच्या रनजी क्रिकेटचा कर्णधार देखील राहिला आहे. आयपीएल 2019 मध्ये त्याने चेन्नईसाठी 17 सामने खेळले असून 383 धावा केल्या होत्या.

3) रविंद्र जडेजा
कर्णधार धोनीचा पर्याय म्हणून रविंद्र जडेजा देखील उत्तम पर्याय आहे. या दिग्गज खेळाडूने आयपीएलमध्ये 170 सामने खेळले आहेत. तर 1927 धावा काढल्या आहेत. 48 वेळा नाबाद राहिलेल्या जडेजाने 135 चौकार आणि 65 षटकार लगावले आहेत. गोलंदाजी देखील त्याने केली असून 170 सामन्यात 108 विकेट घेतले आहेत. 2019 च्या आयपीएलमध्ये त्यांने 15 विकेट घेतल्या होत्या. आणि 106 धावा जमवल्या होत्या.

4) फाफ डु प्लेसी
दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार फाक डुप्लेसीला धोनीच्या जागी चेन्नईची कमान संभाळण्यास दिली जाऊ शकते. त्याने आयपीएल 2019 मध्ये 12 सामन्यात 396 धावा केल्या. टूर्नामेंटमध्ये 71 सामने खेळून 1853 धावा बनवल्या. या दरम्यान फाफने 12 अर्धशतक लगावले तर 163 चौकार, 59 षटकार त्यांच्या नावे आहेत. त्याने 42 झेल देखील घेतले आहेत. कर्णधार पदाचा अनुभव पाहता धोनीनंतर त्यांच्याकडे चेन्नईची धुरा दिली जाऊ शकते.

5) शेन वॉट्सन
ऑस्ट्रेलियाच्या संघाचा ऑलराऊंडर म्हणजे शेन वॉट्सन. त्याला टी – 20 सामने खेळण्याचा उत्तम अनुभव आहे. या टूर्नामेंटमध्ये त्यांने 134 सामन्यातून 3575 धावा जमवल्या आहेत. तर 15 वेळा नाबाद राहिलेल्या वॉट्सनने 343 चौकार आणि 177 षटकार लगावले आहेत. तसेच 38 झेल देखील घेतले आहेत. त्याने आयपीएलमध्ये 4 शतक तर 19 अर्धशतक केले आहेत. मागील सीजनमध्ये त्यांनी चेन्नईसाठी 17 सामन्यात 398 धावा केल्या असून त्यात 96 चा त्याचा उत्तम असा स्कोर राहिला आहेत.

धोनीचा आयपीएल रेकॉर्ड
चेन्नई सुपरकिंग्सच्या कर्णधार धोनीने आयपीएलच्या करिअरमध्ये 190 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 42.20 च्या सरासरीने 4432 धावा केल्या आहेत. धोनी 65 वेळा नाबाद राहिला आहे. तर 23 अर्धशतक केली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 137.85 आहे. त्याचा उच्चतम स्कोर नाबाद 84 धावा आहेत. धोनीने विकेटकिपरम्हणून 98 कॅच 38 स्टंप देखील केले. धोनीच्या नावे 190 सामन्यातून 297 चौकार आणि 209 षटकार लगावले आहेत.

174 सामन्यात कर्णधार, 104 मध्ये विजयी
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने 174 सामने खेळले आहेत. यातील 104 मध्ये त्यांनी विजय मिळवला आहे, तर 69 मध्ये हार स्वीकारावी लागली आहे. एक मॅच ड्रॉ झाली. धोनीच्या कर्णधार नेतृत्वात संघाचे यश 60.11 टक्के आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/