क्रिकेट विश्वचषक २०१९ : जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक

पोलीसनामा ऑनलाईन टीम –आयपीएलची रणधुमाळी संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक सामन्यांकडे लागले आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली क्रिकेटविश्वातील ही प्रसिद्ध स्पर्धा यावेळेस इंग्लंडमध्ये होत आहे. भारतातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा या विश्वचषक स्पर्धेवर असणार आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारताने दोनदा विश्वचषक उंचावला होता. भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली तर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता. 2003 मध्ये भारताला उपविजेत्यावर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा एकदा विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० मे ते १४ जुलैपर्यंत विश्वचषकातील सामने रंगणार आहेत.

इंग्लंडमध्ये भारतीय संघाची कामगिरी
भारताने इंग्लंडमध्ये आतापर्यंत ७४ वन डे सामने खेळले आहेत त्यातील ३६ सामने भारताने जिंकले आहेत तर ३४ सामने गमावले आहेत. एक सामना टाय झाला आहे तर तीन सामने अनिर्णित झाले आहेत.

भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, शिखर धवन, विराट कोहली,रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक हे सात खेळाडू सोडले तर उरलेले सर्व खेळाडू हे तिशीच्या आतील खेळाडू आहेत. कुलदीप यादव (वय – २४) वयाने सर्वात लहान खेळाडू आहे. भारतीय संघाचे सरासरी आयुर्मान २९.९२ इतके आहे.

भारतीय संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक

पहिला सामना
५ जून भारत विरुद्ध द. आफ्रिका दुपारी ३ पासून

दुसरा सामना
९ जून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी ३ पासून लंडन

तिसरा सामना
१३ जून भारत विरुद्ध न्यूझीलंड दुपारी ३ पासून नोटिंगहॅम

चवथा सामना
१६ जून भारत विरुद्ध पाकिस्तान दुपारी ३ पासून मँचेस्टर

पहिली उपांत्य लढत
९ जुलै, दुपारी ३ पासून

पाचवा सामना
२२ जून, भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुपारी ३ पासून

सहावा सामना
२७ जून, भारत विरुद्ध विंडीज दुपारी ३ पासून

सातवा सामना
३० जून, भारत विरुद्ध इंग्लंड दुपारी ३ पासून

आठवा सामना
२ जुलै, भारत विरुद्ध बांग्लादेश दुपारी ३ पासून

नववा सामना
६ जुलै, भारत विरुद्ध श्रीलंका दुपारी ३ पासून

दुसरी उपांत्य लढत ११ जुलै, दुपारी ३ पासून

अंतिम लढत १४ जुलै, लंडन दुपारी ३ वाजता