ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा कॅप्टन सरफराजची टीम इंडियासाठी ‘फुल टू बॅटिंग’, विराट कोहलीवर उधळणी ‘स्तुतीसुमनं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने भारतीय संघाविषयी एक विधान केले आहे. भारत आणि इंग्लड यांच्या सामन्यात भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलताना त्याने हे विधान केले आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवावर अनेक जणांनी टीका केली होती. मात्र सरफराज अहमद याने या प्रकरणावर भारतीय संघाची बाजू घेत म्हटले कि, या सामन्यात भारतीय संघ जाणूनबुजून हरला हे शक्य नाही असे त्याने म्हटले.

यावेळी बोलताना त्याने म्हटले की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. याआधी पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंनी भारतीय संघाच्या या पराभवावर शंका व्यक्त करत भारतीय संघ या सामन्यात पूर्ण क्षमतेने खेळला नसल्याची टीका केली होती.
पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये जाऊ द्यायचे नसल्याने भारतीय संघ या सामन्यात मुद्दामहून हरला असा आरोप त्यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.

virat-kohli-and-sarfaraj

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा भारताच्या विजयासाठी पाकिस्तानचे फॅन प्रार्थना करत होते. त्याचबरोबर या सामन्याआधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यानेदखील या सामन्यात आम्हाला भारताची मदत हवी असल्याची म्हटले होते. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला असता तर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी होती. या सामन्याविषयी अधिक बोलताना सरफराज अहमद म्हणाला कि, या सामन्यात भारत मुद्दामहून हरला असे म्हणणे योग्य ठरणार नाही. या सामन्यात इंग्लंडने चांगला खेळ करून विजय मिळवला.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत त्याने शोएब मलिक याच्या निवृत्तीवर भाष्य करताना म्हटले कि, त्याला निरोपाचा सामना मिळायला हवा होता, त्याचबरोबर हा वर्ल्डकप त्याच्यासाठी फार चांगला गेला नाही. त्याच्या खेळाच्या बळावर त्याने अनेक वर्ष देशाची सेवा केली. संघात असणे सर्वांच्या फायद्याचे होते. त्याचबरोबर या वर्ल्डकप मध्ये पाकिस्तानची कामगिरी काही विशेष न झाल्याने त्यांना साखळी सामन्यांमधूनच बाहेर पडावे लागले होते.

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय