ICC World Cup 2019 : रोहित शर्माचा ‘हे’ रेकॉर्ड धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत १० पॉईंट्ससह ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नऊ आणि आठ पॉईंट्स मिळवत न्यूझीलंड आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.

या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा देखील या स्पर्धेत भलत्याच फॉर्ममध्ये असून या स्पर्धेत भारतीय संघासाठी तो हुकुमी एक्का आहे. त्याच्या फलंदाजीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. मात्र या स्पर्धेत त्याचा एक रेकॉर्ड मोडू शकतो .

१५० पेक्षा जास्त धावांचा रेकॉर्ड

रोहित शर्मा याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात सात वेळा दीडशे पेक्षा जास्त केल्या आहेत. मात्र काल झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने देखील सहाव्यांदा १५० पेक्षा जास्त धवनची खेळी केली. त्यामुळे रोहित शर्माचा हा रेकॉर्ड या स्पर्धेत मोडला जाऊ शकतो.

हा रेकॉर्ड मोडला

एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर होता, मात्र या स्पर्धेत इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गन याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात १७ षटकार मारत रोहित शर्माचा हा रेकॉर्ड मोडला.

दरम्यान, या स्पर्धेत रोहित शर्मा उत्तम फॉर्ममध्ये असून त्याने आतापर्यंत या स्पर्धेत २ शतकांसह ३१९ धावा केल्या आहेत. यात पाकिस्तानविरद्ध करण्यात आलेल्या १४४ धावांची सर्वोच्च खेळीचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज