ICC World Cup 2019 : पाकिस्तान अजूनही सेमीफायनलच्या रेसमध्ये, ‘या’ संघावर संकट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडच्या विजयामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ३१ धावांनी पराभव केला. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव ठरला. या विजयासह इंग्लंड गुणतालिकेत पुन्हा चौथ्या क्रमांकावर आले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानची धाकधूक देखील वाढवली आहे.

मात्र काल इंग्लडने मिळवलेल्या विजयानंतर देखील पाकिस्तानच्या सेमीफायनलमधील आशा जिवंत आहे, मात्र यासाठी पाकिस्तानला खूप मोठ्या प्रमाणात दुसऱ्या संघांवर अवलंबून रहावे लागणार आहे. सध्या गुणतालिकेत १४ गुणांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर असून भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर काल मिळवलेल्या विजयानंतर इंग्लंड चौथ्या स्थानावर पोहोचले आहे.

या स्पर्धेत इंग्लंडचा एक सामना बाकी असून त्यांना न्यूझीलंडविरुद्ध लढायचे आहे. त्यामुळं त्यांना या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडलादेखील या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यात न्यूझीलंड पराभूत होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने याआधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर भारतीय संघाचे अजून दोन सामने बाकी असून यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तरी देखील भारतीय संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात इंग्लडने विजय मिळवला तर १२ गुणांसह इंग्लंड थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र त्याचबरोबर पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये या जागेसाठी लढाई होईल. पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तानचे देखील ११ गुण होतील. मात्र ऊत्तम रनरेटच्या बळावर न्यूझीलंड या जागेवर दावा सांगेल.

पाकला काय करावे लागेल ?

नेट रन रेटचा विचार करता न्यूझीलंड (०.५७२) आघाडीवर आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट – ०.७९२ असा आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या पराभवासह त्यांना बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. पाकिस्तानने मोठ्या फरकाने बांगलादेशवर विजय मिळवला तर पाकिस्तानचा रनरेट आधिकमध्ये जाऊन पाकिस्तान चौथ्यासाठी आपला दावा मजबूत करेल.

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ