ICC World Cup 2019 : दक्षिण अफ्रिकेचा कॅप्टन म्हणतो ‘या’ दोन संघात होणार वर्ल्डकपचं फायनल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आता फक्त सेमीफायनल आणि फायनलचे सामने बाकी असून या सामन्यांत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लड आणि भारत या चार संघानी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. ९ जुलै रोजी पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. त्याआधीच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने या स्पर्धेबाबत भविष्यवाणी केली आहे. त्याने या वर्ल्डकपचा अंतिम सामना हा भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार असल्याचे म्हटले आहे. या स्पर्धेच्या साखळी सामन्यातील अंतिम सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून या स्पर्धेचा विजयी निरोप घेतला. त्याचबरोबर त्याने बोलताना म्हटले कि, आमच्या विजयाने भारतीय संघाला आनंद झाला असेल. कारण मागील सलग तीन सामन्यांत न्यूझीलंडचा पराभव झाला असल्याने भारतीय संघाचे मनोबल उंचावले असणार.

यावेळी अधिक बोलताना त्याने म्हटले कि, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर भारत न्यूझीलंडला नमवून प्रवेश करेल आणि भारताने इंग्लंडमध्ये अंतिम सामना होईल. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी मोठ्या सामन्यांत चांगली कामगिरी केली असल्याने मी या दोघांपैकी एका संघाला समर्थन देणार आहे. भारताने शनिवारी श्रीलंकेचा पराभव करून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने पराभव केल्यामुळे ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर घसरली.

दरम्यान, या स्पर्धेत भारताने साखळी सामन्यांमध्ये फक्त एक पराभव स्वीकारला असल्याने या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताचे पारडे जड वाटतं आहे. त्यामुळे उद्या कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक बातम्या

वजनावर ठेवायचे आहे नियंत्रण, तर चुकूनही करू नका ‘या’ ८ चुका

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

Loading...
You might also like