World Cup 2019 : पाकिस्तान नाही तर ‘हा’ देश ठरणार भारतासाठी डोकेदुखी ?

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. प्रत्येक भारतीयांना भारत विश्वचषक जिंकेल अशी अपेक्षा आहे. विश्वचषकामध्ये सर्वात अटीतटीची लढत असते ती भारत आणि पाकिस्तान संघामध्ये. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान भारताची डोकेदुखी ठरेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, बांगलादेश हाच भारताची डोकेदुखी ठरु शकतो.

https://twitter.com/iamRo45_fc/status/1135359124986880000

बांगलादेशाने बलाढ्या दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून आपण ही विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. बांगलादेशाने तीन शतकी धावसंख्या उभारुन दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला. आफ्रिकेचा संघ दमदार पुनरागमन करू शकतो. पण या दरम्यान बांगलादेशच्या बाबतीत जर या विश्वचषकात एक योगायोग जुळून आला, तर मात्र बांगलादेशचा संघ भारत आणि इतर बलाढ्य संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

दक्षिण अफ्रिकेचा बांगलादेशाने पराभव केला. या स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेचा सलग दुसरा पराभव झाला असला तरी बांगलादेशाने मात्र विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशाने यापूर्वीच्या दोन विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यात विजयी सलामी दिली आहे. म्हत्वाचे म्हणजे या दोन्ही वेळी बांगलादेश दुस-या फेरीत पोहचला होता. योगायोगाने यंदाच्या विश्वचषकात देखील बांगलादेशाने सुरुवातीचा सामना जिंकला आहे. यंदाची स्पर्धा ही राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे दुसरी फेरी ही थेट उपांत्य फेरी असणार आहे. त्यामुळे जर बांगलादेशाच्या बाबतीत हा योगायोग जुळून आला तर अनेक बलाढ्य संघांना हा देश डोकेदुखी ठरू शकतो.