ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाकडून ‘या’ दोघांना कायमची ‘सुट्टी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्ल्डकपनंतर अनेक देशांच्या दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली आहे. त्यानंतर आता भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील दोन जणांनी भारतीय संघाची या स्पर्धेनंतर साथ सोडली आहे. भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी या स्पर्धेनंतर भारतीय संघाबरोबरच करार न वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे यापुढे ते भारतीय संघाबरोबर काम करणार नाहीत. याबाबत त्यांनी बीसीसीआयला माहिती दिली होती. त्यांनी हा करार न वाढवण्याचे सांगितले आहे. यापुढे आपल्याला विश्रांतीची गरज असून आपण कोणतेही काम करणार नसल्याचे दोघांनीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवले होते.
Image result for shankar basu

याविषयी फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी ट्विट करत भारतीय संघाचा निरोप घेतला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बीसीसीआयचे आभार मानताना म्हटले कि, चार वर्ष भारतीय संघाबरोबर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार.

image.png

त्याचबरोबर भारतीय संघ आणि इतर सपोर्ट स्टाफला देखील त्यांनी आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी म्हटले कि,  आज माझा भारतीय संघाबरोबर शेवटचा दिवस आहे. आम्ही साजेशी कामगिरी करू शकलो नाही .
Image result for patrick farhart

दरम्यान, भारतीय संघाचा फिटनेस उंचावण्याचे श्रेय या दोघांना जात असून त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तींची नेमणूक थोड्याच दिवसांत करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. याविषयी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला कि, मैदानावरील माझी ऊर्जा आणि फिटनेस श्रेय त्यांनाच जाते. या वर्ल्डकपनंतर आता भारतीय संघ वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

 

 

You might also like