ICC World Cup 2019 : ‘वर्ल्ड कप फिक्स’, ‘बांगलादेश आणि श्रीलंकेकडून भारत मुद्दाम हारणार’ ; या’ माजी क्रिकेटरची भविष्यवाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाची कामगिरी हि दमदार होत असताना पाकिस्तानी संघाची मात्र सुमार कामगिरी होतं दिसत आहे. भारतीय संघाबरोबर झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव तर पाकिस्तान संघावर टीका सुरु झाली होती. भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे.

सोशल मीडियावर देखील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.एकीकडे भारतीय संघाचे सेमीफायनलमधील स्थान पक्के असताना पाकिस्तान मात्र प्रवेश करण्यासाठी धडपडताना दिसून येत आहे. मात्र आता याचदरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अली यानं एक धक्कादायक विधान केले आहे.

या स्पर्धेत भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी कमबॅक करत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा पराभव करत सेमीफायनलमधील आपल्या प्रवेशाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र या सगळ्यात त्यांचे सेमिफायनलमध्ये पोहचणे हे इतर संघांवर अवलंबून आहे. यातच बासित अली यानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सेमिफायनलमध्ये जाऊ नये म्हणून भारत मुद्दाम श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याविरोधात सामना गमावेल, असे धक्कादायक विधान केले आहे.

त्यामुळे त्याच्या या विधानामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. पुढे त्याने बोलताना म्हटले कि, “ऑस्ट्रेलियाही मुद्दाम भारताविरुद्ध सामना हरला. एवढेच नाही तर,१९९२ च्या वर्ल्ड कपमध्येही न्यूझीलंडचा संघ जाणून बुजून सेमिफायनलमध्ये पाकिस्तान विरोधात हरला होता”. त्यामुळे त्याच्या या विधानावर काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाकिस्तानला हवी भारताची साथ

या सगळ्यात जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना भारतावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारताचे श्रीलंका, इंग्लंड, वेस्टइंडीज आणि बांगलादेश यांच्याबरोबर सामने बाकी आहेत. त्यामुळे भारत इंग्लंड किंवा बांगलादेश यांच्याविरोधात सामन्यात पराभूत झाला तर, पाकिस्तानचा संघाचे सेमीफायनलचे स्वप्न धुळीस मिळेल. त्यामुळं पाकिस्तानचे चाहते आता भारतीय संघ सर्व सामने जिंकू देत अशी प्रार्थना करत असतील. त्यामुळे आता आगामी सामन्यांत काय घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

वेदनेकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका,अन्यथा होऊ शकतात गंभीर समस्या

एका महिन्यात घटवा ५ किलो वजन, करा ‘हे’ उपाय

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’

ताणतणावामुळे वाढत चालले आहे नैराश्याचे प्रमाण