ICC World Cup 2019 : सामन्याआधीच मोईन अलीकडून विराट कोहलीला ‘ही’ धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने काल विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ देखील सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र इंग्लंडचा सेमीफायनलाच रस्ता थोडा अवघड झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचे आव्हान थोडे कठीण झाले आहे. स्पर्धेत उरलेल्या दोन सामन्यांत विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना मोठे प्रयत्न करवे लागणार आहेत. त्यांचा पुढील सामना उद्या भारताबरोबर होणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी इंग्लडने माईंडगेम सुरु केला आहे. इंग्लंडचा खेळाडू मोईन अली याने या सामन्याआधी विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

विराटला करणार ‘आउट’

‘द गार्डियन’ या वृत्तपत्राशी बोलताना तो म्हणाला कि, इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ दबावात असेल. विराट कोहली विषयी बोलताना तो म्हणाला कि, विराट भारतासाठी धावा करण्याचा नेहमी प्रयत्न करित असतो. त्यामुळे या सामन्यात त्याला आउट करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुम्ही त्याला आउट करून देखील त्याचे मित्र राहू शकता. मी लहानपणी मित्रांसोबत खूप कॉम्पिटिटिव क्रिकेट खेळलो आहे. मोईन अली हा २०१८ आणि २०१९ या वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बँगलोर मध्ये खेळला आहे.

दरम्यान, आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मोईन अलीने विराट कोहलीला आतापर्यंत ७ वेळा आउट केले आहे. त्यामुळे या स्पर्धेत भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीला मोईन अली आउट करतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

 

You might also like