ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये टीम इंडिया ‘या’ संघाशी भिडणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. उर्वरित दोन स्थानांसाठी आता तीन संघांमध्ये टक्कर आहे. यात न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. भारतासमोर सेमीफायनलमध्ये कोणता संघ येईल याचीदेखील गणितं भारतीय पाठीराखे मांडताना दिसून येत आहेत. तर चला पाहुयात सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कुणाशी भिडणार…

भारतीय संघाने वर्ल्डकपच्या इतिहासात सातव्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी भारतीय संघ तीन वेळा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गेला आहे. त्यात दोन वेळा भारतीय संघाने विजय मिळवला असून एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी सेमीफायनलमध्ये भारतीय संघ कुणाशी भिडणार याची चर्चा रंगू लागली आहे.

गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर

भारतीय संघाने आठ सामन्यांमध्ये सहा विजय मिळवले असून सध्या १३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा आजून एक सामना श्रीलंकेविरुद्ध होणार असून हा सामना जिंकून भारतीय संघाला गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. मात्र १४ गुणांसह सध्या पहिल्या क्रमांकावर असलेली ऑस्ट्रेलिया देखील या स्पर्धेत आहे. त्यामुळे या आठवड्याच्या शेवटी पहिल्या क्रमांकावर कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.

दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यास या संघाशी लढत

सर्व समीकरणांवर नजर टाकल्यास भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर असे झाले तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी भारतीय संघाची लढत होईल. सध्या न्यूझीलंड गुणतालिकेत ११ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तर ते तिसऱ्या क्रमांकावर राहणार आहेत. त्यामुळे भारतीय संघ सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडबरोबर भिडू शकते.

वर्ल्ड कप: सेमीफाइनल में किस टीम से हो सकता है भारत का मुकाबला?

तर इंग्लंड विरुद्ध होईल सामना

जर इंग्लंड त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले तर त गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहतील. या परिस्थितीत भारतीय संघाचा सामना सेमीफायनलमध्ये इंग्लंडबरोबर होऊ शकतो.

पाकिस्तानबरोबर सामना ?

जर काही चमत्कार झाला आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये गेले आणि भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर गेला तर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पाकिस्तानबरोबर सामना होऊ शकतो. मात्र अशी शक्यता फार कमी आहे.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे