ICC World Cup 2019 : टीम इंडियाच्या पराभवानंतर रवि शास्त्री यांची प्रशिक्षक पदावरून होणार ‘उचलबांगडी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील काल झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यातील पराभवानंतर मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना या पदावरून दूर केले जाऊ शकते. शास्त्री प्रशिक्षक असताना भारतीय संघाने एकदाही आयसीसीच्या स्पर्धा जिंकलेल्या नाही. त्यांच्या अपयशाची यादी मोठी होत चालली आहे. यामुळे त्यांना या पदावरून दूर करण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

यावेळी हटवणार पदावरून
शास्त्री यांची जुलै २०१७ मध्ये या पदावर नेमणूक करण्यात आली होती. वर्ल्डकप २०१९ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. मात्र सेमीफायनल मध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांना या पदावर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या काही आधिकाऱ्यांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार लवकरच या पदासाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शास्त्री या पदासाठी अर्ज करतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघ या महिन्यात वेस्टइंडीज दौऱ्यावर जात असून या दौऱ्यानंतर नवीन प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

मोठ्या मालिकांत पराभव
रवी शास्त्री मागील दोन वर्षांपासून भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत. यादरम्यान भारतीय संघ कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. मात्र मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला यश आले नाही. २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर काल सेमीफायनलमध्ये भारतीय संघ पराभूत झाला. त्याचबरोबर वर्ल्डकप आधी झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा फटका बसला होता.

 

आरोग्यविषयक वृत्त

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like