WTC 2021 फायनलच्या पूर्वी सरावाच्या मॅचमध्ये न्यूझीलँडने दाखवला ‘जोश’, टीम इंडियाला दिला ’इशारा’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत आणि न्यूझीलँड (New Zealand) मध्ये पुढील महिन्यात 18 ते 22 जूनपर्यंत इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळला जाईल. येथे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढील महिन्यात इंग्लंडसाठी रवाना होईल. तर केन विलियमसनची न्यूझीलँड (New Zealand) टीम इंग्लंडला पोहचली आहे आणि आपल्या तयारीला लागली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये किवी टीमचे पारडे भारताविरुद्ध थोडे जड दिसत आहे.

भारतीय खेळाडू मोठ्या कालावधीनंतर टेस्ट मॅच खेळण्यासाठी थेट 18 जूनला मैदानात उतरतील, तर किवी टीम चॅक्पियनशिपच्या अगोदर आयोजक इंग्लंडच्या विरूद्ध 2 जून पासून दोन टेस्ट मॅचेसची सीरीज खेळेल, ज्या त्यांच्यासाठी सरावासारख्या असतील, पण किवी टीमने यापूर्वीच फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीने भारताला इशारा दिला आहे.

फलंदाज आणि गोलंदाजांनी दाखवली तयारी
न्यूझीलँडच्या इन्ट्रा स्क्वॉड सराव सामन्यात फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी आपल्या तयारीची झलक दाखवली. सराव सामन्यात डेव्हॉन कॉन्व्हे, ग्रँडहोम आणि ब्रेसवेलने नाबाद जलद अर्धशतकाची खेळी केली. तर वँगनर, टिम सौदी आणि रचिन रवींद्र तिघांनी मिळून 6 विकेट घेतल्या. कॉन्व्हे इंग्लंड आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्लेईंग इलेव्हानसाठी आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कॉन्व्हेला पहिल्यांदा टेस्ट टीममध्ये निवडले आहे आणि त्याने सरावाच्या सामन्यात अर्धशतक ठोकले. इंग्लंड आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कॉन्व्हे किंवा टॉम ब्लँडेलमध्ये कुणीतरी एक टॉम लाथमसोबत ओपनिंग करू शकतो.

READ ALSO THIS :

निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी उतम व्यायाम पायऱ्या चढणे

Pune : ‘गँगस्टर गज्या मारणे कोण आहे माहिती आहे का? मिरवणुक आम्हीच काढली होती’; मारहाण करून सावकारी करणारा ‘गोत्यात’

 

तणाव आणि चिंतेमध्ये जगत असाल, तर दररोजच्या नित्यकर्मामध्ये ‘हे’ 3 व्यायाम सामील करा


Pune : दुर्दैवी ! विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या, बारामती तालुक्यातील घटना


हाय ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्यासाठी दररोज करा ‘ही’ योगासनं