युवराज सिंग पुन्हा दिसणार मैदानावर, ‘या’ संघातून खेळणार टी-20 क्रिकेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिक्सर किंग युवराज सिंग लवकरच पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसू शकेल. युवराज सिंगने जाहीर केले की, तो लवकरच भारतात टी -20 क्रिकेट खेळताना दिसू शकेल. दरम्यान, युवराज सिंगने जून 2019 मध्ये क्रिकेटला निरोप दिला होता आणि तो बीसीसीआयच्या परवानगीने परदेशी लीगमध्ये खेळत होता. यामुळे युवराज आयपीएलही खेळू शकला नाही. मात्र, आता युवराज सिंग पंजाब संघातून टी -20 क्रिकेट खेळताना दिसू शकतो.

युवराज सिंग परतणार
मिळालेल्या माहितीनुसार युवराज सिंग टी -20 क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तो अलीकडेच पंजाबमधील युवा क्रिकेटपटूंना मदत करताना दिसला होता आणि आता तो या संघाकडून टी -20 क्रिकेट खेळतानाही दिसू शकतो. एका मुलाखतीत युवराज सिंग म्हणाला, ‘या तरुण खेळाडूंबरोबर वेळ घालवण्याचा मला आनंद झाला. मला वाटले की, हे खेळाडू माझे म्हणणे समजून लवकरात लवकर शिकू शकतात. फलंदाजीच्या काही युक्त्या शिकवण्यासाठी मला नेटवरही जावे लागले. मी चांगले शॉट्स खेळत आहे याबद्दल मला आश्चर्य वाटले. मी बऱ्याचं दिवसांपासून बॅट पकडली नाही आणि तरीही मी चांगला खेळत आहे.

युवराज फिटनेसवर करतोय काम
युवराज सिंग पंजाबच्या ऑफ सीझन कॅम्पमध्ये तरुणांना मदत करताना दिसला. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत त्याने आपल्या फिटनेसवरही काम केले. युवराज सिंगने ट्रेनिंग घेतली आणि फलंदाजीचा सरावदेखील सुरू केला. युवराजने सराव सामन्यातही चांगल्या धावा केल्या. युवराज म्हणाले की, पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी युवराजसिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सेवानिवृत्तीवरून परत येण्यास सांगितले. युवराज टी -20 संघात युवा खेळाडूंसह खेळला तर त्याला बरेच काही शिकायला मिळेल.

युवराज म्हणाला की, त्याने आधीच घरगुती क्रिकेटला निरोप दिला आहे पण पुनीत बालीची ऑफर मी नाकारू शकत नाही. मी यावर विचार करत आहे. युवराज सिंग म्हणाले की, पंजाबने चॅम्पियनशिप जिंकला पाहिजे अशी इच्छा आहे. युवराज म्हणाले की, पंजाबचा क्रिकेटपटू शुभमन गिल टीम इंडियामध्ये आहे आणि राज्यातील 3-4 क्रिकेटपटूंमध्येही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्ती आहे.