‘सिक्सर किंग’ युवराज नव्या इनिंगसाठी ‘रेडी’, पत्नी आणि भावासह करणार ‘वेब’ सीरिज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटर युवराज सिंगनं गेल्या वर्षी रिटायरमेंटनंतर आतापर्यंत अनेक टी 20 लीगमध्ये सहभाग घेतला आहे. आता युवराज सिंगनं अ‍ॅक्टींगमध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच युवराज एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. खास बात अशी की, या सीरिजमध्ये त्याची पत्नी हेजल कीच आणि भाऊ जोरावर सिंग देखील दिसणार आहेत. हेजल कीच अ‍ॅक्ट्रेस आहेत. तिनं बॉडीगार्ड, बिल्ला आणि हीर हिरो यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

वेब सीरिजमध्ये दिसणार युवराज सिंग
या वेब सीरिजला आसाममधील ड्रीम हाऊस प्रॉडक्शनचा सपोर्टही आहे. प्रॉडक्शन बॅनरची नीता शर्मा याबाबत बोलताना सांगते, “जोरावर सिंग या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. त्याची आई शबनम सिंग देखील याचा भाग आहे.” एका पत्रकार परिषदेत शबनम यांनी सांगितलं की, या वेब सीरिजचा भाग झाल्यानंतर त्यांना खूप सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. त्या म्हणाल्या, “जगाला आता युवराज सिंग आणि जोरावर सिंगला ओळखण्याची संधी मिळेल. माझा लहान मुलगा जोरावर या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. एक आई या नात्यानं मी माझ्या मुलांसाठी आणि सुनेसाठी खूप खुश आहे.”

भारताचा सिक्सर किंग 38 वर्षीय युवराज सिंग नुकताच ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीनं प्रभावित झालेल्या लोकांच्या आर्थिक मदतीसाठी बुश फायर चॅरिटी मॅच खेळताना दिसला होता. टी 20 मध्ये युवराजच्या नावावर एका ओवरमध्ये 6 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे. 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कपदरम्यान इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या विरोधात त्यानं हा विक्रम केला. 58 टी 20 मॅचमध्ये त्यानं 1177 रन बनवले. यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे.