‘क्रिकेटर’ हार्दिक पंड्यानं गर्लफ्रेंडला विचारलं, ‘बेबी मी तुझा कोण आहे ?’, नताशानं दिलं ‘हे’ उत्तर (व्हिडीओ)

सध्या कोरोना व्हारसच्या प्रकोपामुळं देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी क्वारंटाईन लाईफचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. काही कलाकार तर चक्क रोमँस करताना दिसले. अशातच आता इंडियाच्या क्रिकेट टीममधील क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि त्याची मंगेतर म्हणजेच होणारी बायको अॅक्ट्रेस नताशा स्टानकोविक हेही एकत्र टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-52dSGjRGi/

हार्दिक आणि नताशाचा एक व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. यात दिसतंय की, त्याच्यासोबत नताशाही आहे. हार्दिकनं मजेदार अंदाजात नताशाला विचारलं की, बेबी मी तुझा कोण आहे ? यावर नताशानं खूप मजेदार उत्तर दिलं आहे. ज्यामुळं सध्या हा व्हिडीओ सोशलवर चर्चेत आहे आणि व्हायरल होत आहे.

हार्दिकनं जेव्हा विचारलं की, बेबी मी तुझा कोण आहे यावर नताशा आधी हसते आणि हसता हसता म्हणते, जिगर का टुकडा. तिचं हे उत्तर हार्दिकलाही हसू येतं आणि तोही तिचं वाक्य पुन्हा हसता हसता रिपीट करताना दिसतो. हार्दिक आणि नताशाचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे.