क्रिकेटर हार्दिक पंड्याला ‘लव्हेरिया’, इंस्टावर ‘कबुल’नामा !

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. हार्दिक पंड्या अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात पडला आहे. रविवारी त्याने इन्स्टाग्रामवर इन लव्ह असं पोस्ट केलं होतं, त्याला नताशाने तसाच प्रतिसाद दिला.

हार्दिक पंड्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. त्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. हार्दिकनं रविवारी शेअर केलेल्या फोटोत मी प्रेमात पडलोय, अशी पोस्ट लिहिली. त्यावर नताशानं त्वरित तुझ्याच प्रेमात असे उत्तर दिले.

मुळची सर्बियाची असलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षीय डान्स शिकायला सुरुवात केली. 2010 मध्ये स्पोर्ट्स सर्बिया या किताब जिंकल्यानंतर तिनं स्पोर्ट्समध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने नच बलिए 9 सीजनमध्ये सहभाग घेतला होता.

Visit : Policenama.com