हार्दिक पांड्या ‘या’ मॉडेल बरोबर लवकरच करणार लग्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. याचे कारण म्हणजे त्याचे सध्या नवीन तरुणीबरोबर नाव जोडले गेले असून समोर आलेल्या माहितीनुसार नच बलिए 9 मधील स्पर्धक नताशा स्‍टानकोविक हिला डेट करत आहे. हार्दिक याने नताशा स्‍टानकोविक हिची आपल्या कुटुंबीयांबरोबर देखील ओळख करून दिली आहे.

मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या पार्टीमध्ये देखील दोघांना एकत्र पाहिले गेले होते. त्याचबरोबर या पार्टीमध्ये त्याचे कुटुंबीय देखील होते. त्याचबरोबर त्याने नताशा हिची आपला भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुडी हिच्याबरोबर देखील ओळख करून दिली. त्यामुळे हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

कोण आहे नताशा स्‍टानकोविक –

नताशाचा जन्म 4 मार्च 1989 ला झाला असून तिने बिग बॉसमध्ये देखील भाग घेतला होता. त्याचबरोबर ती रॅपर बादशाहा याच्या ‘डीजे वाले बाबू’ याच्या गाण्यात देखील दिसली होती. सध्या ती नच बलिये- 9 म्हणून स्पर्धक आहे.

या अभिनेत्रींबरोबर जुडले आहे नाव –

हार्दिक पांड्या हा नेहमीच चर्चेत राहणारा खेळाडू आहे. याआधी देखील त्याचे अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते. यामध्ये उर्वशी रौतेला, एली अवराम आणि ईशा गुप्‍ता यांचा समावेश होता.