क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याला मुंबई विमानतळावरच घेतलं ताब्यात, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

मुंबई : वृत्तसंस्था –  भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांडया यास डीआरआय (DRI) विभागाच्या पथकानं मुंबई विमानतळावरच ताब्यात घेतल्याची माहिती डीआरआयमधील सुत्रांनी दिली आहे. आयपीएल 2020 संपल्यानंतर यूएईमधून भारतात आलेल्या क्रुणाल पांडयाला ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार क्रुणाल पांडयाकडे काही सोन्याचे दागिने, बांगडया आणि इतर मौल्यवान वस्तू तसेच महागडी मनगटी घडयाळे आढळून आले आहेत. त्याबाबत मुंबई डीआरआयचे अधिकारी कु्रणालची कसून चौकशी करीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, क्रिकेटरला ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.