‘या’ अभिनेत्रीसोबत विवाहबद्ध होणार टीम इंडियाचा स्टार मनीष पांडे, सौंदर्य पाहून झाला वेडा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसच्या लिंकअपच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अनुष्का शर्मा हेजल कीच, सागरिका घाटगे आणि गीता बसरासहित अशा अनेक अ‍ॅक्ट्रेसेस आहेत ज्यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत लग्न केलं आहे. या यादीत आता अ‍ॅक्ट्रेस अश्रिता शेट्टीचं नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. अशा बातम्या समोर येत आहेत लवकरच अश्रिता टीम इंडियाचा स्टार मनीष पांडे सोबत लग्न करणार आहे.

https://www.instagram.com/p/B1bFQNJFZ45/

दोघांना घेऊन अनेक दिवसांपासून डेटींग बातम्या समोर येत आहेत. परंतु दोघांपैकी कोणीही लग्नाबद्दल अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. एका इंग्रजी वृत्तानुसार, मनीष आणि अश्रिता शेट्टी यावर्षी 2 डिसेंबर रोजी मुंबईत लग्न करण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/ByUsEdnloh7/

दोघांच्या लग्नाचा कार्यक्रम मुंबईत दोन दिवस चालणार आहे. लग्नाची ही तारीख यासाठी ठरवण्यात आली आहे की, या स्टार स्टडिड इव्हेंटमध्ये टीम इंडियातील जास्तीत जास्त खेळाडू येऊ शकतील. मनीष पांडे सध्याला विजय हजारे क्रिकेट टूर्नमेंटमध्ये कर्नाटक टीमची कॅप्टनसी सांभाळत आहे.

अश्रिताच्या वर्कफ्रंटबदद्ल सांगायचे झाले तर, ती टीव्हीसोबतच साऊथ सिनेमातलीही प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस आहे. तिने इंद्रजीत, ओरू कन्नयम मूनू कलावानिकलम, उदयम, एनएच 4 यांसारखे अनेक सिनेमे केले आहेत. अश्रिता एका ब्युटी कॉम्पीटीशनमुळे चर्चेत आली होती.

https://www.instagram.com/p/BgnJmSlhF6Y/

visit : policenama.com