क्रिकेटपटू महमद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान महमद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin ) यांनी नुकतीच ‘आझम कॅम्पस’ ला भेट देऊन क्रीडाविषयक प्रगतीचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,एस ए इनामदार,इरफान शेख,आझम स्पोर्ट्स अकादमीचे गुलझार शेख यांनी स्वागत केले.अझरुद्दीन यांनी कॅम्पस मधील क्रिकेट मैदान आणि पॅव्हेलियनची पाहणी केली. आझम स्पोर्ट्स अकादमी च्या क्रीडापटू विद्यार्थ्यांशी अझरुद्दीन (Mohammad Azharuddin ) यांनी संवाद साधला. या भेटीदरम्यान अझरुद्दीन समवेत रियाझ बागवान हे उपस्थित होते