मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँकडून हायकोर्टात याचिका दाखल, केली ‘ही’ मोठी मागणी

कोलकाता : वृत्तसंस्था – क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने हायकोर्टात याचिका दाखल करून तिच्या आणि मुलीच्या सुरक्षेची मागणी केली आहे. याचिकेत राम मंदिराबाबत केलेल्या सोशल मीडिया पोस्टवरून धमकी मिळाल्याने केलेल्या 9 ऑगस्टच्या तक्रारीवर पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप तिने केला आहे.

पुढील आठवड्यात हसीन जहाँच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकते. हसीन जहाँने कोलकाताच्या लाल बाजार स्ट्रीटच्या सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

हसीन जहाँनुसार, तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाच ऑगस्टला अयोध्या राम मंदिरच्या शिलान्यासानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या होत्या. ज्यानंतर कट्टपंथीयांनी तिला निशाणा बनवले आणि तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर धमक्या दिल्या जात आहेत.

हसीन जहाँने याबाबत सांगितले की, पाच ऑगस्टला मी सोशल मीडियाद्वारे राम मंदिराच्या भूमिपूजनच्या शुभेच्छा हिंदू बांधवांना दिल्या होत्या. या कारणामुळे काही कट्टरपंथी लोकांनी अभद्र भाषेचा वापर करत माझ्यावर कमेंट केल्या. मला बलात्काराची धमकी देण्यात आली. याच्याविरूद्ध मी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मी तक्रारीत म्हटले आहे की अशा समाजविघातक लोकांविरूद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.

हसीन जहाँ सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. शमीवर त्याची पत्नी हसीन जहांने कौटुंबिक हिंसेचा आरोप केला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयात सुरू आहे.