क्रिकेटर मोहम्मद शमीच्या लहान मुलीनं केला अफलातून डान्स (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भलेही आपल्या खासगी आयुष्यामुळे वादात आहे परंतु मैदानात मात्र त्याचं सादरीकरण कमाल असतं. सध्या शमी आपल्या मुलीमुळे चर्चेत आला आहे. त्याने आपली मुलगी आयराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात आयरा भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

पत्नी हसीन जहाँसोबत असलेल्या कौटुंबिक वादामुळे शमी आपल्या मुलीपासून दूर आहे. परंतु मुलीसाठी असलेले त्याचे प्रेम नेहमीच समोर येताना दिसते.

पत्नीसोबत झालेल्या वादानंतर तो आपल्या मुलीसोबत नातं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या त्याने मुलीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. कॅप्शनमध्ये शमी म्हणतो, “लिटिल डान्सर.”

कमेंट करत शमीने म्हटलं आहे की, “मेरी गुडिया में मुझसे ज्यादा अच्छी डान्स स्किल्स है” सध्या आयराचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

सध्या शमी दक्षिण अफ्रिके विरूद्ध पु्ण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात व्यस्त आहे. शमीने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या आहेत.

 

Visit : Policenama.com