हार्दिक पंड्यानंतर रिषभ पंतचा ‘हा’ फोटो चर्चेचा विषय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांच्यावर ‘कॉफी वुईथ करण’ या शो मधील वक्तव्यावरून सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना. आता भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख खेळाडू आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्या इनस्टाग्रामवरील फोटोमुळे पंत चर्चेत आला आहे. पंतने दिनांक १६ जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना त्याच्या गर्लफ्रेण्डची ओळख करुन दिली.

https://www.instagram.com/rishabpant/?utm_source=ig_embed

२१ वर्षीय रिषभने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव इशा नेगी आहे. तिच्यासोबतचा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, “मला तुला आनंदी ठेवायचं आहे, कारण तुझ्यामुळेच मी एवढा आनंदी आहे.”

कोण आहे इशा नेगी ?
इशा नेगी मूळची उत्तराखंडची आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, ती इंटिरिअर डेकोर डिझायनर असून उद्योजिका आहे. ती अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. तर रिषभ पंतचीही स्टायलिश खेळाडूंमध्ये गणना होते. दुसरीकडे इशानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तोच फोटो पोस्ट करुन लिहिलं आहे की, “माय मॅन, माय सोलमेट, माय बेस्टफ्रेण्ड, द लव्ह ऑफ माय लाईफ रिषभ पंत.”

https://www.instagram.com/ishanegi_/?utm_source=ig_embed
ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच कसोटी मालिकेत खेळलेल्या रिषभ पंतचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे संघात समावेश झालेला नाही. त्यामुळे सध्या तो भारतात परतून कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे.आतापर्यंत ९ कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या रिषभ पंतने २ शतक आणि २ अर्धशतक ठोकली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी चांगली होती. तो दहा टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला असून १५७ धावा केल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us