पत्नीनं ‘न्यूड’ फोटो शेअर करत केलेल्या आरोपांनंतर ‘क्रिकेटर’ मोहम्मद शमीनं मागितला पुरावा, व्हिडीओ शेअर करत हसीन जहाँनं दिलं ‘हे’ उत्तर ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहतात. आपापल्या आयुष्यात ते सध्या व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून हसीन आपल्या काही व्हिडीओमुळं चर्चेत येत आहे आणि ट्रोल होत आहे. तरीही ट्रोलर्सला फाट्यावर मारून खूप बोल्ड व्हिडीओ आजवर तिनं शेअर केले आहेत. परंतु अलीकडेच हसीननं जो फोटो शेअर केला आहे त्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली. यात शमीदेखील आहे. इतकंच नाही तर या फोटोसोबत तिनं मोहम्मद शमीचं कनेक्शनंही सांगितलं होतं. यानंतर शमीनं हे आरोप बिनबुडाचे असल्याचं ते सांगत ते सिद्ध करण्यासाठी सांगितलं आहे. यानंतर आता हसीन जहाँनं यावर उत्तर दिलं आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

हसीननं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा एक डान्स व्हिडीओ आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये ती म्हणते, “स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे आयुष्य खूप लहान आहे.” हसीनचं असं म्हणणं आहे की, आयुष्य गेलं तर काही गोष्टी सिद्ध करता येत नाही. गोष्टी सिद्धच करायच्या असतील तर आयुष्यही कमी पडेल असं तिचं म्हणणं आहे.

हसीनचा हा व्हिडीओ शमीनं आरोप सिद्ध करण्यासाठी सांगितल्यानंतर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमधून तिनं शमीला उत्तर दिलं आहे. तसं तर तिनं यात शमीचं नाव घेतलेलं नाही. परंतु घटनाक्रम आणि तिचं स्टेटमेंट पाहता हे तिचं प्रत्युत्तरच वाटत आहे. या व्हिडीओत एका गाण्यावर एक ग्रुप डान्स परफॉर्मंस दिसत आहे.

काय होते हसीनचे आरोप ?

हसीननं नुकताच एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यात शमीदेखील दिसत होता. सोबतच तिनं खास मेसेजही लिहिला होता. तिनं त्यात त्याचं नावही घेतलं होतं. हसीननं लिहिलं की, “काल तू काहीच नव्हतास तर मी पवित्र होते. आज तू काही बनला आहेस तर मी अपवित्र झाले आहे. खोट्याचा बुरखा टाकून सत्य मिटवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांचाच सहारा असतात. क्रिकेटर मोहम्मद शमी म्हणजेच मोहम्मद शमी अमहद सोबत.”

View this post on Instagram

👈👈🤛🤛💪💪hasin jahan😎

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial) on

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like