MS धोनी पाठोपाठ सुरेश रैनानं जाहीर केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था – भारताला दुसर्‍यांदा विश्वचषक मिळून देणारा महेंद्रसिंग धोनी यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं इंस्टाग्रामवरून जाहीर केलं. त्यानंतर काही वेळातच धोनीच्या इंस्टाग्रामला कमेंट करत भारताचा फलंदाज सुरेश रैनानं देखील आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचं सांगत धोनीच्या प्रवासामध्ये सामील होत असल्याचं सांगितलं आहे.

धोनी आणि सुरेश रैना यांची मैत्री सर्वश्रुत आहे. धोनीनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच रैनानं निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, धोनी आणि रैना हे दोघेही आयपीएल खेळणार असून ते दोघे चेन्नई सुपरकिंग या संघात आहेत. धोनी आणि सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं दोघांच्याही चाहत्यांची घोर निराशा झाली आहे.