‘फ्लॉप’ क्रिकेटर सोबत लग्न केल्यानंतर कोट्यवधीची कंपनी उभी केली ‘या’ सुंदरीनं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वात तसे खूप मोठे ग्लॅमर आणि कमाई देखील आहे. मात्र जर एखादा खेळाडू आपल्या खेळात सातत्य टिकवून ठेऊ शकला नाही तर त्याला अनेक आर्थिक गोष्टींना सामोरे जावे लागते. मात्र एका फ्लॉप झालेल्या खेळाडूच्या पत्नीने स्वतःच्या जीवावर कोट्यवधींचा बिझनेस सुरु करून तो मोठ्या प्रमाणावर वाढवला देखील आहे.

विनय कुमार हा भारतीय क्रिकेट संघातील एक जलदगती गोलंदाज होता. विनयने आपल्या कारकिर्दीमध्ये टीमसाठी 31 वनडे आणि एक कसोटी सामना खेळला होता आणि त्यानंतर तो फ्लॉप खेळाडू ठरला. ज्यामुळे त्याला भारतीय संघात पुन्हा कधी स्थान मिळाले नाही.

2013 मध्ये विनयने रिचा सिंह नावाच्या एका मुलीसोबत लग्न केले होते. त्यानंतर रिचाने एका खाजगी स्पोर्ट कंपनीची सुरुवात केली होती. लग्नाच्या सहा वर्षानंतर रिचाची ही कंपनी आता कोट्यवधींची झालेली आहे.

विनय कुमारला भारतीय संघात खुप जास्त काळ स्थान टिकवता आले नव्हते. परंतु आयपीएलमध्ये तो अनेक वर्षांपासून खेळत आहे. यादम्यान रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी देखील तो खेळला आहे. सध्या विनय कुमार रणजी क्रिकेटमध्ये कर्नाटकच्या कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/