२०११ विश्वचषकातील स्टार युवराज सिंग आज घेणार ‘निवृत्ती’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सर्वत्र विश्वचषकाचा ज्वर दिसून येत आहे. त्यात काल झालेल्या सामन्यात भारताने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावांचा आकडाही बनवला. तसंच जगजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवलेही. त्यानंतर भारतीय संघाची सर्वत्र वाहवाही सुरु आहे. मात्र याच आनंदाच्या वातावरणात एक मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. २०११ च्या क्रिकेट विश्वचषकात ज्याची बॅट तळपली होती. तो युवराज सिंह आज निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये आज दुपारी एक वाजता तो राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे युवराजच्या चाहत्यांना हा दुखद धक्का आहे.

युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत विचार करत असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होते.

३ ऑक्टोबर २०००मध्ये युवराजने केनिया विरोधात वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेकांच्या मनात घर केले. तसंच २००७मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्यात एका षटकात प्रत्येक चेंडूवर षकटार लगावण्याचा पराक्रमही त्याने केला. तेव्हा पासून त्यांची कारकिर्द अधिक उंचावली गेली. मात्र मध्यंतरी तब्येतीमुळे त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. त्यानंतर त्याने क्रिकेट जगतात अनेकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला ते जमलं नाही.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु त्याला बऱ्याच सामन्यात संधी मिळाली नाही. त्यानंतर भारतीय संघात त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही त्याला अपयश आले. टेस्ट क्रिकेटमध्ये २०१२ नंतर युवराज आलाच नाहीये. आलेल्या अपयशामुळे की काय युवराजने आता आपल्या भविष्याबाबत गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज आयसीसीची मंजुरी असलेल्या स्वीकृत परदेशी टी-२० लीगमध्ये फ्रीलान्स क्रिकेटर म्हणून खेळू शकतो. टी-२० ला आयसीसीची मंजुरी मिळाली असली तरी त्याला योग्य प्रारुप मिळालेली नाही. पण पुढे जेव्हा खेळाडूंचा संघ आकार घेईल, तेव्हा निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंबाबत विचार होऊ शकतो, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नमुद केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

दीर्घकाळ तारुण्य टिकवा, दिवसभरातील ‘या’ चुका टाळा

इरेक्शनची समस्या अशी सोडवा, घ्या शरीरसुखाचा आनंद

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय