लॉकडाउनमध्ये वर्धापन दिन साजरा केल्यामुळे वांद्रे जिमखान्याच्या अध्यक्षासह 15 जणांवर FIR

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाउन करण्यात आले असून सर्वकाही बंद करण्यात आले आहे. मात्रा, तरीही अनेकांकडून लॉकडाउनचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. लॉकडाउनचे उल्लंघन करून वांद्रे जिमखान्याचा वर्धापन दिन साजरा केल्याप्रकरणी जिमखाना अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय हो फाउंडेशनचे आदिल फिरोज खत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविला आहे.

राज्यभरात दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाउन केले आहे. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. 4 एप्रिल रोजी या आदेशाचे उल्लंघन करून वांद्रे जिमखान्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमात 15 हून अधिक सभासद मास्क न लावता सहभागी झाले होते

जिमखान्याने याची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रसारित केली होती. त्याचा आधार घेत खत्राी यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी जिमखान्याच्या अध्यक्षा डॉ. शेरील मिस्किटा यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.