Sangli News : वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 16 संचालकांविरोधात गुन्हा दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  सांगली येथील वसंतदादा साखर कारखान्यातील विक्री केलेल्या मालावरचा मूल्यवर्धित कर भरला नसल्याने वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह १६ संचालकांच्या विरोध तेथील संजयनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जीएसटीच्या उपायुक्त शर्मिला विनय मिस्कीन यांनी ही तक्रार दिली होती. या नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.

मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेला तब्बल १२ कोटी ४४ लाख एवढा कर आहे. परंतु या कारवाईचा श्री दत्त इंडिया कंपनीशी काही संबंध नाही असे तेथील व्यवस्थापकांनी सांगितले आहे. तसेच सप्टेंबर २०१७ पासून श्री दत्त इंडिया कंपनीनें वसंतदादा कारखाना चालवण्यासाठी घेतला आहे. वसंतदादा कारखान्याकडून कंट्री लिकरचे उत्पादन करून अन्य व्यापाऱ्यांना या मालाची विक्री केली गेली. यावेळी व्यापाऱ्यांकडून ३५ टके मूल्यवर्धित कर भरून घेतला पण कारखान्याने हा कर भरला नाही. २०१७ पासून ते आतापर्यंत हा कर थकीत पडलेला आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या कालावधीत एकूण ९ कोटी ८ लाख ३५ हजार ६४७ इतका कर थकीत पडला होता. तर त्याचे व्याज ३ कोटी ३६ लाख १८ हजार ३०४ एवढे झाले. असे एकूण १२ कोटी ४४ लाख ५३ हजार ९५१ एवढा मूल्यवर्धित कर थकीत असल्या कारणाने साखर कारखान्याला नोटीस देण्यात आली होती. परंतु तरीही कारखानाने हा कर सरकारकडे जमा केला नाही. म्हणून याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.